शाब्बास! राष्ट्रीय बालचित्रकलेत आदिती फडतरे प्रथम

Aditi Phadtare
Aditi Phadtareesakal
Updated on

गोंदवले (सातारा) : नागपूर (Nagpur) येथील बसोली ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धेमध्ये (National Children Painting Competition) गोंदवले खुर्द (ता. माण) येथील गोपालकृष्ण विद्यालयाच्या (Gopalakrishna School) आदिती जोतिराम फडतरे (Aditi Phadtare) हिने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. (Aditi Phadtare Of Gondwale Village Came First In The National Children Painting Competition Satara Marathi News)

Summary

लॉकडाउन काळात विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने बालचित्रकारांसाठी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

लॉकडाउन (Lockdown) काळात विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी, वेळेचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने या ग्रुपच्या माध्यमातून बालचित्रकारांसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 6 ते 9 व 10 ते 16 वयोगटासाठी झालेल्या या स्पर्धेत देशभरातून 600 स्पर्धक सहभागी झाले होते. आदितीने मत्स्यालय विषय घेऊन कोलाज कामातून चित्र तयार केले होते. तिच्या या चित्राने राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक पटकावला.

Aditi Phadtare
आत्महत्या रोखूया, चला बांधू मानसमैत्रीचे पूल

याबद्दल रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन तिला गौरवण्यात आले. याच विद्यालयातील वसिम शेख याला लहान गटात, तर ज्योती सावंत, संचिता कुलकर्णी, वैष्णवी गेंड, सायली शेडगे, सिध्दी कदम, गीता गेंड, वेणू गेंड, प्राजक्ता पोळ यांनाही सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कलाशिक्षक सादिक शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, मुख्याध्यापक एम. डी. टकले यांनी अभिनंदन केले.

Aditi Phadtare
अनेक आजारांवर 'संजीवनी'सारखं कार्य करतात 'ही' फुलं; जाणून घ्या जबरदस्त फायदे

मला चित्रकलेची खूपच आवड आहे आणि याच क्षेत्रात माझी करिअर करण्याची देखील इच्छा आहे. या स्पर्धेत मला माझ्या कुटुंबीयांसमवेत माझ्या शिक्षकांनी देखील मार्गदर्शन केले, त्यामुळे मी ही स्पर्धा प्रथम क्रमांकाने जिंकू शकले. यापुढे देखील माझा असाच प्रयत्न सुरु राहिल.

-आदिती फडतरे, विद्यार्थिनी

Aditi Phadtare Of Gondwale Village Came First In The National Children Painting Competition Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.