Aditi Swami : बोटे सुजली, जखमा झाल्या... मात्र ती थांबली नाही

सराव करताना कित्येकदा तिची बोटे सुजायची. हाताला जखमा व्हायच्या. कोरोनाच्या दुष्टचक्रात तर सरावात कित्येक समस्या उभ्या राहिल्या. मात्र, ती कधीच थांबली नाही. जिद्दही हरली नाही.
Aditi Swami
Aditi Swamisakal
Updated on

नागठाणे - सराव करताना कित्येकदा तिची बोटे सुजायची. हाताला जखमा व्हायच्या. कोरोनाच्या दुष्टचक्रात तर सरावात कित्येक समस्या उभ्या राहिल्या. मात्र, ती कधीच थांबली नाही. जिद्दही हरली नाही.

सातारा तालुक्यातील शेरेवाडीसारख्या छोट्याशा खेड्यातून पुढे आलेल्या अन् सध्याच्या काळात देशातील स्टार खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिती गोपीचंद स्वामी हिला क्रीडाक्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार काल जाहीर झाला. उल्लेखनीय म्हणजे वयाच्या केवळ १७ व्या वर्षी तिने हे यश पादाक्रांत केले आहे.

मुळात आदिती ही बारीक चणीची खेळाडू. तिच्या शरीरयष्टीवरून इतके भव्य यश तिने कमावले असेल, यावर सहसा कुणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, आदितीने जिद्दीने करून दाखविले. सराव करताना अनेकदा तिची बोटे सुजत असत. हाताला जखमा होत असत. कोरोनाकाळात तर तब्बल दोन वर्षे ती सरावापासून दूर होती.

मात्र, या प्रतिकूलतेवर आदितीने जिद्दीने मात केल्याचे शिक्षक असलेले तिचे वडील गोपीचंद अन् ग्रामसेविका असलेली आई शैला यांनी ‘सकाळ’शी बोलताना नमूद केले. तिच्या यशात प्रशिक्षक प्रवीण सावंत, सहायक प्रशिक्षक शिरीष ननावरे, दृष्टी आर्चरी ॲकॅडमीचे अध्यक्ष सुजित शेडगे, धन्वंतरी वांगडे, सायली सावंत, जितेंद्र देवकर यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी सांगितले. आदिती सध्या साताऱ्यातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बारावी इयत्तेत शिकते.

राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील यश

कडाप्पा (आंध्र प्रदेश), २०१८, रौप्य, सुवर्ण

चंदौली (उत्तर प्रदेश), २०१९, दोन सुवर्ण, एक रौप्य पदक

पंचकुला (हरियाना), २०२१, सुवर्ण

अमरावती (महाराष्ट्र), २०२१, सुवर्ण

हैदराबाद (आंध्र प्रदेश), २०२१, सुवर्ण

जम्मू (जम्मू), २०२२, रौप्य

अहमदाबाद (गुजरात), २०२२, सुवर्ण

जबलपूर (मध्यप्रदेश), २०२२, सुवर्ण

अयोध्या (उत्तर प्रदेश) २०२३, सुवर्ण

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांतील यश

स्वित्झर्लंड, २०२२, सुवर्ण

थायलंड, २०२२, रौप्य

इराक, २०२२, सुवर्ण

शारजा, २०२२, रौप्य

कोलंबिया, २०२३, १८ वर्षांखालील वयोगटात विश्वविक्रम

आयर्लंड, २०२३, युवा जागतिक स्पर्धेत दोन सुवर्ण

जर्मनी, २०२३, जागतिक स्पर्धेत दोन सुवर्ण

फ्रान्स, २०२३, सुवर्ण

थायलंड, २०२३ आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण

चीन, २०२२, आशियाई क्रीडा स्पर्धेत

एक सुवर्ण, एक कांस्य

‘सकाळ’ची बातमी अन् आदिती

आदितीच्या अगदी आरंभीपासूनच्या यशाचा मागोवा दै. ‘सकाळ’ने घेतला. त्यात शालेय जीवनात साताऱ्यातील बापूसाहेब चिपळूणकर शाळेत असताना तिने धनुर्विद्या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. याविषयीची बातमी नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध झाली होती. या यशानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.