त्या 'क्वारंटाइन' वाल्यांच्या कथेविषयी प्रशासन म्हणाले...

त्या 'क्वारंटाइन' वाल्यांच्या कथेविषयी प्रशासन म्हणाले...
Updated on

लोणंद (जि.सातारा)  : वाई, खंडाळा व महाबळेश्वर या तालुक्‍यांत शाळा, कॉलेज, हॉस्पिटल ताब्यात घेऊन तेथे विलगीकरण कक्ष उघडण्यात आले आहेत. त्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल. तेथे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाइन केले जात आहे. या सर्व ठिकाणाच्या कक्षात प्रशासनाच्या माध्यमातून शंभर टक्के सर्व सुविधा उपलब्ध करण्याचा कसोशीने प्रयत्न केला जात आहे. अद्यापही हे कक्ष विकसित केले जात आहेत. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा झटून काम करत आहे. कोणी काही म्हटले तरी असणारे सर्वच विलगीकरण कक्ष पंचतारांकित हॉटेल वगैरे तर नाहीत ना? त्यामुळे विलगीकरण कक्षातील अडचणीबाबत कोणी काही म्हटले तरी त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ व तथ्यही नाही, असे प्रांताधिकारी संगीता चौगुले- राजापूरकर यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.
शाब्बास..! बॅंड वादकाची अशीही जिद्द 
 
भाजपचे जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, युवा कार्यकर्ते हर्षवर्धन शेळके- पाटील, प्रजित परदेशी व अन्य भाजप कार्यकर्त्यांनी पाडेगाव (ता. खंडाळा) येथील समता आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षाला काल भेट देऊन तेथील महिलांशी सोयीसुविधांबाबत चर्चेनंतर महिलांनी अडचणी मांडल्या. त्यावर श्री. सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना प्रशासनाला धारेवर धरत वाई, शिरवळ व पाडेगाव येथील विलगीकरण कक्षात दोन दिवसांत सुधारणा न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

तुम्ही "स्टिंग ऑपरेशन'करता काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर आपण त्यांना कृपया "स्टिंग ऑपरेशन'ची भाषा करू नका, असे ठणकावून सांगितले.

त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी चौगुले म्हणाल्या, ""जिल्ह्यातील प्रशासनही पालकमंत्री, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गांभीर्याने काम करत आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्व काही योग्य पद्धतीने कामकाज सुरू आहे. वाई विभाग तर क्वारंटाइन कक्षात सोयीसुविधा उपलब्ध करण्यात अग्रेसर आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी खुद्द माझी व्यवस्था शिरवळला करा म्हणून आमच्याकडे मागणी केली. मात्र, कोणाला काय म्हणायचे असेल तर त्यांनी जरूर म्हणावे. मात्र, प्रशासन जनतेला सर्व सोयीसुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे.'' 
संपादन - सिद्धार्थ लाटकर

तिच्या वडिलांनी 12 एकर शेती, फ्लॅट विकला, नातेवाईकांचे सोने गहाण ठेऊन सात लाख रुपये कर्ज, अन्य नातेवाइकांकडून पैसेही घेतले...पण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.