Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगल उसळताच उदयनराजेंनी मध्यरात्री दिली घटनास्थळी भेटी; केलं महत्त्वपूर्ण आवाहन

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत शांततेचं आवाहन केलं आहे.
Pusesavali Riots MP Udayanraje Bhosale
Pusesavali Riots MP Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

दंगल उसळल्‍यानंतर खासदार उदयनराजे यांनी रात्री दोनच्या सुमारास साताऱ्यातील शाही मस्‍जिदला भेट देत मुस्‍लिम बांधवांशी चर्चा केली.

सातारा : सोशल मीडियावर महापुरुषांबाबत (Pusesawali Viral Post) वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळं पुसेसावळीत काल रात्री उशिरा दंगल (Pusesawali Riots) भडकली. संतप्त जमावाने येथील प्रार्थनास्थळावर हल्ला करत आतील 11 जणांना मारहाण केली.

जमावानं केलेल्‍या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. नूरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृताचे असून, हल्‍ल्‍यातील 10 जखमींवर कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी सरफराज बागवान यांच्‍या फिर्यादीवरून औंध पोलिसात (Aundh Police) तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल केलाय.

Pusesavali Riots MP Udayanraje Bhosale
Pusesawali Riots : पुसेसावळीत दंगलीचा भडका उडताच कऱ्हाडात तणावपूर्ण शांतता; मध्यरात्रीच पोलिसांनी घेतली बैठक, मोठा बंदोबस्त तैनात

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी मुस्लिम बांधवांची भेट घेत शांततेचं आवाहन केलं आहे. पुसेसावळीत दंगल उसळल्‍यानंतर खासदार उदयनराजे यांनी रात्री दोनच्या सुमारास साताऱ्यातील शाही मस्‍जिदला भेट देत मुस्‍लिम बांधवांशी चर्चा केली.

Pusesavali Riots MP Udayanraje Bhosale
Pusesawali Riots : अल्पसंख्याकांची घरं जाळणारा पुसेसावळी दंगलीचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांसमोर मोठं आव्हान

झालेला प्रकार दुर्दैवी, निंदनीय असून, यापुढील काळात जिल्‍हावासीयांनी शांतता राखणे आवश्‍‍यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली असून, त्‍याचे पालन करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. सध्या सातारा जिल्ह्यात वातावपूर्ण वातावरण आहे. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.