साताऱ्यात वाहन दंड कमी करण्‍यासाठी आंदोलन

वाहनांवरील कारवाईदरम्‍यान आकारण्‍यात येणारा दंड कमी करण्‍याच्‍या मागणीसाठी आज जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्‍ट्र कामगार, कर्मचारी संघाच्‍या वतीने शहरातील रिक्षाचालकांनी आंदोलन केले.
Rickshaw Driver Agitation
Rickshaw Driver AgitationSakal
Updated on

सातारा - वाहनांवरील (Vehicle) कारवाईदरम्‍यान आकारण्‍यात येणारा दंड (Fine) कमी करण्‍याच्‍या मागणीसाठी आज जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर अखिल महाराष्‍ट्र कामगार, कर्मचारी संघाच्‍या वतीने शहरातील रिक्षाचालकांनी आंदोलन (Agitation) केले.

याबाबतचे निवेदन आंदोलक रिक्षाचालकांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयास दिले आहे. राज्‍य शासनाने वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर केलेल्‍या कारवाईदरम्‍यान आकारण्‍यात येणाऱ्या दंडामध्‍ये प्रचंड वाढ केली आहे. ही वाढ सर्वसामान्‍य जनतेची तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे कंबरडे मोडणारी आहे. कोरोना काळात अनेकांच्‍या हाताचे रोजगार हिरावले गेले असून, त्‍यांना दररोज हातातोंडाची गाठ घालताना कसरत करावी लागत आहे.

Rickshaw Driver Agitation
...तर डॉक्टर घालतील कामावर बहिष्कार

सद्य:स्‍थितीत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असून, त्‍याला तोंड देत सर्वसामान्‍य प्रवाशांची ने-आण करण्‍याचे काम खासगी वाहतूकदार, रिक्षाचालक करत आहेत. या वाहनांवरील दंडातही प्रचंड वाढ केली असून, एखाद्यावेळी झालेल्‍या कारवाईदरम्‍यान त्‍यास इतका दंड भरणे शक्‍य होणार नाही. शासनाने सर्वसामान्‍यांचा विचार सहानुभूतीपूर्वक करत केलेली दंड वाढ मागे घेण्‍याची मागणीही निवेदनात करण्‍यात आली आहे. या निवेदनावर चंद्रकांत खंडाईत, बाळकृष्‍ण देसाई, शशिकांत खरात व इतर रिक्षा व्‍यावसायिकांच्‍या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.