School Students : 'सहानुभूती नको, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे'; भर पावसात विद्यार्थ्यांवर आली आंदोलनाची वेळ

किती दिवस एसटीचा मनमानी कारभार सहन करायचा? विद्यार्थ्यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया
School Students Aundh ST Bus
School Students Aundh ST Busesakal
Updated on
Summary

एसटी महामंडळाच्या कारभाराचा फटका वेळोवेळी विद्यार्थ्यांना बसत असून, त्यामुळे भर पावसात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली.

औंध : येथे सातारा ते कान्हरवाडी ही एसटी गाडी वेळेत न आल्याने शाळकरी मुली व मुलांनी (School Student) भरपावसात रात्री सुमारे तीन तास औंध बस स्थानकात (Aundh Bus Station) ठिय्या आंदोलन करून घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

टेंपो नको, सहानुभूती नको, आम्हाला वेळेत एसटी गाडी मिळालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देऊन एसटी प्रशासनासह शासकीय प्रशासन यंत्रणा हलवून सोडली. विद्यार्थ्यांचे रौद्ररूप पाहून बस स्थानकात ग्रामस्थ, युवकांनी गर्दी केली होती.

School Students Aundh ST Bus
Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

या वेळी कोरेगाव आगार व एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराबद्दल ग्रामस्थ, विद्यार्थी, पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. येथे माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी कळंबी, वडी, त्रिमली, नांदोशी, तसेच पुसेसावळी भागातून शेकडो विद्यार्थी येतात.

सोमवारी शाळा सुटल्यानंतर कळंबी, वडी, त्रिमली, नांदोशीचे विद्यार्थी सायंकाळी साडेचारपासून सातारा- कान्हरवाडी एसटी गाडीची वाट पाहात औंध बस स्थानकात बसले होते. मात्र, सहा वाजले, तरी एसटी गाडी न आल्याने या मार्गावरील शाळकरी मुलांनी बस स्थानक परिसरात गाड्या प्रवेश करणाऱ्या मार्गावर भरपावसात आंदोलन सुरू केले.

School Students Aundh ST Bus
धक्कादायक! बहिणीला शेवटचा फोन करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, पत्नीनंही स्वत: ला संपवण्याचा केला प्रयत्न

या वेळी शालेय प्रशासनाने एसटी गाडी येत नाही म्हटल्यावर खासगी टेंपो गाडीची व्यवस्था केली. मात्र, किती दिवस एसटीचा मनमानी कारभार सहन करायचा? अशा संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. वेळेत एसटी गाड्या सोडल्याशिवाय याठिकाणावरून हटणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रात्री नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही.

School Students Aundh ST Bus
Ambadas Danve : 'शिवसेना त्या गद्दारांकडं आता ढुंकूनही पाहणार नाही'; दानवेंचा शिंदे गटावर जोरदार प्रहार

या वेळी सातारा- कान्हरवाडी ही उशिरा आलेली एसटी गाडीही विद्यार्थ्यांनी रोखून धरली होती. दरम्यान, रात्री उशिरा सातारा विभाग नियंत्रक, कोरेगाव आगार, वडूज आगाराच्या अधिकाऱ्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर, तसेच औंधचे उपसरपंच दीपक नलवडे, सहसचिव प्रा. संजय निकम, प्राचार्य एस. बी. घाडगे, उपप्राचार्य प्रा. प्रदीप गोडसे, भरतबुवा यादव, संतोष जाधव, ग्रामस्थ, शिक्षकांनी मध्यस्थी केल्यानंतर विद्यार्थी एसटीमधून कळंबी गावी जाण्यास तयार झाले.

‘‘एसटी महामंडळाच्या कारभाराचा फटका वेळोवेळी विद्यार्थ्यांना बसत असून, त्यामुळे भर पावसात ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली. यापुढे तरी होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वेळेत एसटी गाड्या सोडाव्यात अन्यथा यापेक्षा वेगळे आंदोलन छेडू.’’

-करुणा सगरे, विद्यार्थिनी इयत्ता नववी

School Students Aundh ST Bus
Neelima Chavan Case : मृत्यूच्या आदल्या दिवशी नीलिमा कुठे होती? घातपात झाला का? पोलिसांनी दिली महत्वाची अपडेट..

‘‘औंध शिक्षण मंडळाच्या विविध विद्या शाखांमध्ये सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बरेचसे विद्यार्थी परगावहून एसटी बसने येतात. विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन एसटी महामंडळाने वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी. याबाबत एसटी महामंडळाच्या विभागांशी पत्रव्यवहार केला आहे.’’

-प्रा. संजय निकम सहसचिव औंध शिक्षण मंडळ, औंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.