कोणावरही टीका करताना वरिष्ठांनी शहानिशा करावी; सुनिल शेळके प्रकणावरुन धाकट्या पवारांचा थोरल्या पवारांना सल्ला

सुनिल शेळके यांचा स्वभाव तसा नाही. आमची राजकीय भूमिका वेगवेगळी असली तरी शेवटी आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही.
Sharad Pawar Ajit Pawar
Sharad Pawar Ajit PawarSakal
Updated on
Summary

इथे गर्दी नसेल तर आमदार बाळासाहेब पाटील यांनी दबाव आणल्यामुळं इथं गर्दी नाही, असं म्हणणं योग्य नाही. त्यात काही अर्थ नाही.

कऱ्हाड : वरिष्ठांनी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. सुनिल शेळके यांची भूमिका ऐकून पुण्यात माझी भूमिका मांडलीये. आम्हाला जर कोणी जवळ येवून काही सांगितलं तर त्याची आम्ही शहानिशा केली पाहिजे, त्यात तथ्य आहे की नाही हे बघितलं पाहिजे, असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुनिल शेळकेंसंदर्भात खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan Jayanti) यांच्या १११ व्या जयंतीनिमीत्त उपमुख्यंत्री पवार आज येथील त्यांच्या समाधीस्थळी राज्य सरकारच्या वतीने अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, आज आम्ही कऱ्हाडला आलो. इथे गर्दी नसेल तर आमदार बाळासाहेब पाटील यांनी दबाव आणल्यामुळं इथं गर्दी नाही, असं म्हणणं योग्य नाही. त्यात काही अर्थ नाही.

Sharad Pawar Ajit Pawar
Loksabha Election : कोल्हापूरचा ग्राउंड रिपोर्ट थेट दिल्लीतून; प्रशांत किशोर-चाणक्य संस्थेकडून सर्व्हे, कोण मारणार बाजी?

बाळासाहेब पाटील यांचा तो पिंडही नाही. त्यांना अपक्ष म्हणूनही निवडूण आणण्याचं काम येथील जनतेनं केलं आहे. आज मी येथे सभा लावली. मी सुनिल तटकरेंना बोलवले. तटकरे यांनी गर्दी कमी दिसल्यावर कोणतरी आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, नितीन पाटलांमुळे गर्दी झाली नाही असे सांगितले तर ते योग्य आहे का?

Sharad Pawar Ajit Pawar
'हुकूमशाही वृत्तीतून राज्यघटना बदलण्याचे षड्‍यंत्र, हेगडेंची भाजपमधून हकालपट्टी करा'; मुख्यमंत्री आक्रमक

सुनिल शेळके यांचा स्वभाव तसा नाही. आमची राजकीय भूमिका वेगवेगळी असली तरी शेवटी आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही. आता मला कऱ्हाडमध्ये खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, इतर सहकारी भेटले आम्ही एकमेकांना नमस्कार केला. त्यामुळे यातूनच पुढे जायचे आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.