आता कुठं तरी सावरतोय, गावागावांत जातीय तेढ निर्माण करू नका : अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawaresakal
Updated on
Summary

'सामाजिक बांधिलकी जपली तरच आपण उभारी घेऊ शकतो.'

शिवथर (सातारा) : कोरोना महामारीतून (Coronavirus) आत्ता कोठे तरी आपण सावरतोय. एकमेकांना मदत करा, गावागावांमध्ये जातीय तेढ निर्माण करू नका. सामाजिक बांधिलकी जपली तरच आपण उभारी घेऊ शकतो, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

शिवथर (ता. सातारा) येथील माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीला मिळालेल्या १ कोटी ३६ लाख रुपये निधीतून सुरू असलेल्या कामांचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil), पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, वनिताताई गोरे, सतीश चव्हाण, सचिन जाधव उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले, ‘‘किसन वीर साखर कारखाना मोठ्या संकटातून चालला आहे. ‘किसन वीर’, ‘खंडाळा’ आणि ‘प्रतापगड’ कारखान्यांवर ९०५ कोटींचे कर्ज आहे. मकरंद पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी कारखाना निवडणूक जिंकली. काही कर्मदरिद्री लोकांनी तोंडचा घास पळवत स्वतःची पोळी भाजून घेतली. कारखान्याच्या कामगारांना पगारापोटी ४० कोटी रुपये कारखाना देणं आहे. २०२० आणि २०२१ चे शेतकऱ्यांचे ५८ कोटी रुपये कारखाना देणे लागतो. यासंदर्भात शरद पवारांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ.’’

Ajit Pawar
कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांची फसवणूक; भाजप आमदारासह सहा जणांवर गुन्हा

या वेळी कोरोना काळात उल्‍लेखनीय काम केलेल्या कोरोना योद्ध्यांचा आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास किरण साबळे-पाटील, सरपंच रूपालीताई साबळे, उपसरपंच सुनील साबळे, सदस्य दत्तात्रय साबळे, संतोष हवाळे, संतोष कांबळे, सदस्या हेमलता साबळे, प्रिया साबळे, नशिम इनामदार, माजी उपसरपंच प्रकाश साबळे, सचिन जाधव, एकनाथ जाधव, ग्रामविकास अधिकारी विलास माने व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()