सातारा- राज्यसभेच्या उमेदवारीबाबत अजित दादा गटाची बैठक काल रात्री पार पडली. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते उपस्थित होते. राज्यसभा उमेदवाराबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी राज्यसभेसाठी नितीन पाटील यांच्यासह भुजबळ कुटुंबीयातून एक, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी यांच्या नावाची चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेची राष्ट्रवादीच्या वाटेची एक जागा साताऱ्याचे नितीन पाटील यांना देण्याचां निश्चित झालं आहे. नितीन पाटील वाई महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ आहेत. नितीन पाटील सध्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आहेत. अजित पवार यांनी दिलेला शब्द पाळला अशी चर्चा त्यामुळे सुरु आहे.