Organ Donation : अवयवदानाने अक्षय जामदार ठरला देवदूत मृत्‍यूपश्‍‍चात कुटुंबीयांचा निर्णय; पाच इच्छुक गरजवंतांना मिळणार जीवनदान

Organ Donation : अपघातात एकुलता एक मुलगा गमावलेल्या जामदार कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला, ज्यामुळे अक्षय जामदार पाच जणांसाठी देवदूत ठरला आहे.
Organ Donation
Akshay Jamdar Organ Donationsakal
Updated on

कोळकी : नियतीने ३० वर्षांचा एकुलता एक मुलगा हिरावून घेतल्‍याने, दु:खाचा डोंगर कोसळलेल्‍या

मालोजीनगर (ता. फलटण) येथील जामदार कुटुंबीयांनी त्‍याच्‍या अवयवदानाचा निर्णय घेऊन अनोख्‍या दातृत्‍वाचे दर्शन घडवले. त्‍यांच्‍या या दातृत्‍वाबद्दल सर्वत्र चर्चा होत असताना, त्‍यांच्‍या मुलामुळे पाच जणांना जीवनदान मिळण्‍याच्‍या शक्‍यतेने संबंधितांसाठी अक्षय जामदार मात्र देवदूतच ठरला.

मालोजीनगर येथील अक्षय राजेंद्र जामदार या ३० वर्षीय युवकाचा श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आळंदी-पंढरपूर महामार्गावर पुण्याहून फलटणकडे येताना काळज ते बडेखानच्या दरम्यान अपघात झाला. त्‍यात त्‍याच्‍या मेंदूला जबर मार बसला होता. एकुलता एक मुलगा अक्षयला जबर मार लागल्याने त्याचा मेंदू निकामी होणार असल्याचे उपचाराअंती स्पष्ट झाले. प्रयत्नांची शर्थ करूनही मुलाचे प्राण वाचू शकणार नाहीत, याची कल्पना डॉक्टरांनी जामदार कुटुंबीयांना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.