Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक कर्मचाऱ्यांना चक्रीका ॲप का बंधनकारक करण्यात आले आहे : अतुल म्हेत्रे

विधानसभा निवडणूक कामासाठी नेमलेल्या कर्तव्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना चक्रिका ॲप डाउनलोड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.
Chakrika app
Chakrika appsakal
Updated on

कऱ्हाड : विधानसभा निवडणूक कामासाठी नेमलेल्या कर्तव्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना चक्रिका ॲप डाउनलोड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली.

निवडणुकीसाठी नेमलेल्या विभागीय प्रमुखांच्या प्रशिक्षणात ते बोलत होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता पवार, आचारसंहिता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप पाटील, प्रताप कोळी, एस एस पवार, निवडणूक नायब तहसीलदार हेमंत बेसके, प्रभारी नायब तहसीलदार युवराज पाटील उपस्थित होते.

Chakrika app
Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

श्री. म्हेत्रे म्हणाले, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदानासाठी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचे लोकेशन कळावे, यासाठी मोबाईलमध्ये चक्रीका ॲप डाऊनलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चक्रिका ॲप मतदानाच्या आदल्या दिवशी १९ नोव्हेंबरला व मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला सुरू ठेवणे बंधनकारक आहे.

Chakrika app
Satara Assembly Election 2024 : होमगार्डस्‌चा आर्थिक भार पोलिसांवरच

या ॲपमुळे एखादे केंद्र त्यांना नेमून दिलेल्या केंद्रावर वेळेत पोहचले नसेल किंवा काही अनुचित प्रकार अथवा घटना घडत असेल तर ते या ॲपच्या माध्यमातून त्वरित कळणार आहे. त्याचा निवडणुक यंत्रणेला मोठा उपयोग होवुन संबंधित ठिकामी तातडीने उपाययोजना करणे सोपे होणार आहे. चक्रीका ॲपमुळे कर्मचाऱ्यांचे लोकेशन निवडणूक आयोगाला शेअर होत असते. या चक्रीका ॲपमुळे कर्मचाऱ्यांचे लाईव्ह लोकेशन मिळणार आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना दिलेल्या आयडी व मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन करुन ॲप घ्यावे लागणार आहे.

चार दिवस सुरु ठेवावे लागणार अॅप

चक्रीका ॲप हे मतदानाच्या तीन दिवस अगोदर म्हणजे १८, १९ व प्रत्यक्ष मतदानादिवशी २० तारखेला तसेच मतदानानंतर दोन दिवस दि.२१ व २२ रोजी सुरू ठेवण्यात येणार असून हे ॲप दर वीस सेकंदांनी संपूर्ण माहिती निवडणुक आयोगाला पाठवत असते. सर्व माहिती तालुका, जिल्हा, मुंबई व दिल्ली येथील निवडणुक आयोगाला काही सेकंदात कळणार आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.