सिंगापूर, मलेशिया सहलीच्या आमिषातून नऊ लाखांची फसवणूक

जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतील 27 जणांचा समावेश
Singapore
Singaporeesakal
Updated on

कोरेगाव (सातारा) : ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात सिंगापूर (Singapore) व मलेशिया (Malaysia) येथे सहलीला (Trip) नेतो, असे सांगून सुमारे पावणेनऊ लाखांची रक्कम अॅडव्हान्सपोटी घेऊन सहलीला न नेता जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांतील २८ जणांची फसवणूक केल्याप्रकरणी अंबरनाथ (जि. ठाणे Ambernath Thane) येथील एका दांपत्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Summary

अंबरनाथ येथील ब्ल्यू वर्ल्ड हॉलिडेज कंपनीमार्फत ज्येष्ठ नागरिकांना स्वस्तात परदेशी सहल केली जात असल्याचे सांगितले.

याप्रकरणी श्रीकांत सोनवणे व ललना सोनवणे (दोघेही रा. ल. खा. मानेनगर, कोंडूज, अंबरनाथ पश्चिम) या दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात विलास शंकर भोसले (रा. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की श्रीकांत व ललना हे दोघे २०१९ मध्ये मला व माझ्या मित्रांना भेटले होते. अंबरनाथ येथील ब्ल्यू वर्ल्ड हॉलिडेज कंपनीमार्फत (Blue World Holidays Company) ज्येष्ठ नागरिकांना स्वस्तात परदेशी सहल केली जात असल्याचे सांगितले. या दांपत्याने २० ते ३० मे २०१९ या कालावधीत कोरेगाव येथे ग्रुपच्या बैठका घेतल्या. सिंगापूर व मलेशिया येथे ज्येष्ठ नागरिकांना सवलत म्हणून पती, पत्नींना प्रत्येकी ६५ हजारांमध्ये विमानाने नेऊन तेथे चांगल्या प्रकारची सेवा देण्याचे प्रलोभन दाखवले.

Singapore
तस्करांच्या घरातून वाघ, बिबट्याची आणखी नऊ नखं जप्त

माझ्यासह उत्तम सोनावले, सुरेश फणसे, सुशीला भोसले, मंगल जाधव, संगीता नलवडे, राजाराम नलवडे, रामचंद्र कदम, ज्योत्स्ना कदम, कमल भोसले, प्रदीप येवले, प्रभावती येवले, संजय धुमाळ, रंजना धुमाळ (सर्व रा. कोरेगाव), राहुल जाधव (रा. पुसेगाव), शोभा इंगळे (रा. उंब्रज), मंजूषा जगदाळे (रा. लोणंद), शंकरराव चव्हाण, कल्पना चव्हाण (रा. सातारा), कृष्णाजी जाधव, पुष्पा जाधव (रा. वेळू), शिवाजी साळुंखे, शालन साळुंखे, मोहन बर्गे, सुलोचना बर्गे (रा. शिरढोण), रामचंद्र जाधव, रुक्मिणी जाधव (रा. अंबवडे संमत कोरेगाव), चंद्रकांत पवार, सिंधू पवार यांचा समावेश असलेल्या ग्रुपकडून अॅडव्हान्सपोटी आठ लाख ७० हजारांची रक्कम घेतली. त्यावेळी करारनामाही केला आहे. त्यानंतर १७ आॅगस्टला मुंबई विमानतळावरून सहलीला जायचे आहे व उर्वरित रक्कम सहलीला गेल्यावर जमा करायची आहे, असे आम्हाला कळवले. त्या वेळी व त्यानंतरही सहलीला नेण्यास टाळाटाळ केली. अॅडव्हान्सपोटी दिलेली रकमेचे धनादेश दिले; परंतु खात्यावर शिल्लक नसल्यामुळे ते धनादेश न वटता परत आले.

Singapore
सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वरसह 'या' पालिकांसाठी लवकरच 'रणधुमाळी'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.