भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या वेळी तत्परतेने येथे धाव घेत वाहतूक सुरळीत करून वारकऱ्यांची वाहने सोडून दिली.
सायगाव : आनेवाडी टोल नाक्यावर (Anewadi Toll Plaza) आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) आळंदीच्या दिशेने पायी प्रवास करत असणाऱ्या दिंडीच्या वाहनांना तब्बल एक तास टोलसाठी अडवून ठेवले. वारकऱ्यांच्या वाहनांना नेहमी टोलमाफी दिली जाते. मात्र, तरीही येथील अधिकाऱ्यांनी टोल नाकारल्याने टोल नाक्यावर गोंधळ निर्माण झाला होता.
या वेळी वारकरी (Warkari) आक्रमक बनले होते. जवळपास दहा वाहने टोलवर तशीच उभी होती. एक तास हा गोंधळ सुरू होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलवरून मोफत सोडण्याचे आदेश दिले, तरीदेखील मुजोर अधिकारी अशा आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. या वेळी वारकरी व टोलचे अधिकाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांनी या वेळी तत्परतेने येथे धाव घेत वाहतूक सुरळीत करून वारकऱ्यांची वाहने सोडून दिली. या वेळी तात्यासाहेब वासकर कोल्हापूर फड, अप्पासाहेब वासकर, आजरेकर, देहूकर, हभप तुकाराम मांडवकर कोल्हापूर, विठ्ठल पाटील, अप्पासाहेब वासकर फड, निवृत्ती महाराज ही प्रमुख मंडळी यावेळी वारकऱ्यांसोबत होती. त्यांनाही या अधिकाऱ्यांनी अरेरावी केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.