माझा ढाण्या वाघ परत आला; अस्मानी संकटांशी झुंजलेल्या सुपुत्राला 'आई'चा कडक सॅल्युट!

Anil Waichal
Anil Waichalesakal
Updated on

ढेबेवाडी (सातारा) : खवळलेल्या समुद्रात (Ocean) डोंगराएवढ्या लाटांशी तब्बल दहा तास झुंज देत जगण्या-मरणाची लढाई जिंकून नुकताच आपल्या मूळ गावी परतलेल्या अनिल निवृत्ती वायचळ (Anil Waichal) यांच्या अचाट साहसाला वायचळवाडीकरांनी कडक सॅल्यूट ठोकला. "माझा ढाण्या वाघ परत आला,' असे म्हणत आई श्रीमती शांताबाई यांनी आपल्या जिगरबाज पोराला कडकडून मिठी मारत अश्रूंना मोकळी वाट करून दिली आणि सारे वातावरणच गलबलून गेले. (Anil Waichal Back To Home After Fight With Ocean Cyclone Tauktae Satara Marathi News)

Summary

"माझा ढाण्या वाघ परत आला,' असे म्हणत आई शांताबाई यांनी आपल्या जिगरबाज पोराला कडकडून मिठी मारत अश्रूंना मोकळी वाट करून दिली.

अरबी समुद्रात ड्युटी बजावत असताना तौक्‍ते वादळामुळे (cyclone tauktae) ओढवलेल्या भीषण संकटांशी दहा तास धैर्याने टक्कर दिलेल्या अनिल वायचळ यांच्या वाटेकडे वायचळवाडी येथील त्यांच्या वृद्ध आईसह गावकरी दहा-बारा दिवसांपासून डोळे लावून बसलेले होते. पत्नी सौ. प्रगती व दोन लहान मुले सोहम व लावण्या यांच्यासमवेत अनिल यांचे गावात आगमन होताच "माझा ढाण्या वाघ परत आला' असे म्हणत आईने त्यांना कडकडून मिठी मारताच वातावरण गलबलून गेले. खवळलेल्या समुद्रातील तो दहा तासांचा थरार अनिल यांच्या तोंडून ऐकताना अनेकांच्या डोळ्यासमोर टायटॅनिक चित्रपटच (Titanic movie) उभा राहिला. छोट्याशा वाडीतील सामाजिक व धार्मिक कार्यात, तसेच प्रत्येकाच्या सुख दुःखाच्या प्रसंगात धावून येणारा सुपुत्र अस्मानी संकटांशी झुंज देऊन परतल्याच्या आनंदाबरोबरच त्याच्या अचाट साहसाचा अभिमान या वेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून ओसंडताना दिसला.

Anil Waichal
उदयनराजेंच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला

''मरण समोर दिसत होते; परंतु उद्याचा सूर्य मी पाहणारच ही सकारात्मक इच्छाशक्ती आणि सर्वांच्या आशीर्वादाचे पाठबळ मला सुखरूपणे परत घेऊन आले. डोंगरदऱ्यात बागडत आणि उन्ह पावसात दगड धोंड्यांशी खेळत लहानाचा मोठा झालो. त्यातूनच धाडस अंगात भरलं जे या प्रसंगात कामी आले, असे सांगताना अनिल वायचळ म्हणाले, ""अनेक जण मला आता परत समुद्रात ड्युटी वर जाणार का? असे विचारत आहेत, माझे वडील सैन्य दलात सुभेदार होते. घाबरून कर्तव्य सोडून पळणे माझ्या रक्तात नाही. सुटी संपल्यावर मी पुन्हा कामावर रुजू होईन.''

Anil Waichal Back To Home After Fight With Ocean Cyclone Tauktae Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.