कऱ्हाड : येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्यामुळे गोरगरिबांना बाहेर उपचारासाठी जावे लागते. खासगी डॉक्टरांचे शुल्क व अन्य खर्चही मोठा आहे, त्यामुळे गरीब तेथे उपचार न घेताच परताना दिसतात. त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञांची त्वरित नेमणूक करावी, अशी मागणी येथील दक्ष कऱ्हाडकर ग्रुपतर्फे खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली आहे. सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनाही त्यांनी निवेदन दिले आहे.
ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी ही मागणी केली आहे. खासदार पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार येथील उपजिल्हा रुग्णालयामधील प्रसूती कक्ष चांगल्या प्रकारे सुरू आहे. या विभागात वर्षभरात जवळपास एक हजार 500 महिलांची प्रसूती अगदी व्यवस्थित व सुरक्षित पार पडली आहे. सरकारी हॉस्पिटल असल्याने येथे होणारी प्रसूती निःशुल्क असून, उपचार होतात, त्यामुळे तालुक्यासह शहरातील अनेक गोरगरीब महिलांना त्याचा अत्यंत चांगला फायदा होतो आहे; परंतु तेथे हॉस्पिटलमध्ये सध्या स्त्रीरोग तज्ज्ञ नाही. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने दहा दिवस एकही प्रसूती झालेली नाही. उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना बाहेर प्रसूतीसाठी जावे लागते. स्त्रीरोग तज्ज्ञ नसल्याने त्यांना बाहेरच उपचार करण्याचा सल्ला देण्यात येतो आहे. उपजिल्हा रुग्णालयात होणारा प्रकार एकदम चुकीचा आहे.
सत्ताधा-यासह विरोधी सदस्यांच्या कातरखटावात राजकीय उड्या
त्यामुळे गोरगरीब लोकांना परिस्थिती नसताना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्या सगळ्या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या उपजिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर स्त्रीरोग तज्ज्ञाची नेमणूक करावी, ज्यामुळे लोकांची गैरसोय टाळता यावी.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.