पालखी सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; 'या' मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

सोहळ्याच्या स्वागतासह मुक्कामाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala esakal
Updated on
Summary

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala : पालखी मार्गावर १२ ठिकाणे निश्चित करून २४ बंदिस्त महिला स्नानगृहाची व्यवस्था केली आहे.

सातारा : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) सहा जुलैला जिल्ह्यात आगमन होणार आहे, तर पाहुणचार घेऊन ११ जुलैला पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. सोहळ्याच्या स्वागतासह मुक्कामाची जय्यत तयारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्ह्यात पालखीचे लोणंद, तरडगाव, फलटण व बरड येथे एकूण पाच मुक्काम आहेत. पालखीसोबत असलेल्या वारकऱ्यांसाठी (Warkari) फिरत्‍या शौचालयाचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी (Collector Jitendra Dudi) यांनी दिली.

पालखी सोहळ्याचा जिल्ह्यात सात जुलै रोजी लोणंद येथे दिवसभर व रात्रीचा मुक्काम असेल, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, ‘‘आठ जुलै रोजी सकाळचा विसावा, दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल, तर मुक्काम तरडगाव येथे होणार आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
Pilgrims Bus Accident : यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊन परतताना मोठी दुर्घटना! मिनी बस-ट्रकच्या धडकेत 13 यात्रेकरू ठार, दोन जण गंभीर जखमी

ता. नऊ जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून काळजच्‍या दत्त मंदिरात विसावा, निंभोरे ओढा येथे भोजन, दुपारचा विसावा वडजल व फलटण दूध डेअरी, तर रात्रीचा मुक्काम फलटण (विमानतळ) येथे असेल. ता. १० जुलै रोजी सकाळी फलटण येथून प्रस्थान, सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, दुपारचा विसावा निंबळक फाटा, रात्रीचा मुक्काम बरड येथे असेल. ११ जुलैला बरड येथून प्रस्थान, सकाळचा विसावा साधूबुवाचा ओढा, दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ, दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा (पानसकर वाडी) येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश व रात्रीचा मुक्काम नातेपुते (जि. सोलापूर) येथे असणार आहे.’’

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पाडेगाव येथे जयदुर्गा मंगल कार्यालयासमोर स्वागत मंडप उभारण्याचे तसेच मान्यवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आसन व्‍यवस्‍था होईल. पालखी विसावा, पालखी तळावरील झाडेझुडपे काढण्याबाबत संबंधित यंत्रणांना कार्यवाही सुरू आहे. पालखी महामार्गावरील खड्डे, साइडपट्ट्या तसेच पालखीतळावर मुरूम/खच टाकून रोलिंग करण्याचे कामकाज सुरू आहे. पालखी विसावा चबुतऱ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट तसेच पालखी विसावा व पालखी तळाकडे जाणारे अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे काम जिल्हा परिषदेकडून सुरू आहे. शौचालये उभारणीचे ठिकाण व संख्या तसेच मैला गाळ व्यवस्थापन ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
Satara Police : 'पैशांचा पाऊस पाडून देतो'; आमिष दाखवून 36 लाख रुपये लुबाडणाऱ्या काका महाराजाला अटक, 'अंनिस'चीही आक्रमक भूमिका

शौचालयांचे नियोजन

लोणंद- १३ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, तरडगाव -१७ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, फलटण- १३ ठिकाणी १८०० फिरते शौचालय, बरड- २१ ठिकाणी १८०० फिरते शौचालय तसेच पालखी महामार्गावर ३७ ठिकाणे निश्चित करून ७४ तात्पुरत्‍या शौचालये उभारण्‍यात आले आहेत. स्वच्छतेसाठी तीनशे लोकांची टीम तयार असेल.

पाण्याची सुविधा

पाण्याचे स्रोत व पाण्याचे टँकर भरण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. यासाठी ३२२- विहिरी, ७४- बोअरवेल, ९- सार्वजनिक पाणी टाकी अशा एकूण ४०५ ठिकाणांहून वारीसाठी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ३४५० टँकर भरण्याची क्षमता असून, २१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

महिला स्नानगृहांची व्यवस्था

पालखी मार्गावर १२ ठिकाणे निश्चित करून २४ बंदिस्त महिला स्नानगृहाची व्यवस्था केली आहे. पालखी महामार्गावरील पाडेगाव, तरडगाव, बरड, विडणी, कापडगाव, कोरेगाव, सुरवडी, राजुरी, निंभोरे, पिंपरद, निंबळक, वडजल, काळज, जाधववाडी (फलटण) आणि कोळकी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे १५ तात्पुरते निवारा शेड उभारणी करण्यात आली आहेत.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala
हडपसरमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना; पुणे, साताऱ्यासह कराडमध्ये हिंदू समाज आक्रमक, 'हा' महामार्ग रोखला

पोलिसांकडून निर्बंध

पालखी मार्गावरील मांसाहारी हॉटेल, कत्तलखाने, मासळी बाजार, दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. परिवहन विभागाकडून पालखी सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या सुरक्षाविषयक तपासणीचे आदेश काढण्यात आलेले आहेत. खाद्यगृह, खाद्यपदार्थ, शीतपेय यांची अन्न व औषध प्रशासनातर्फे तपासणी आदेश काढण्यात आलेले आहेत. लोणंद मुक्कामी पाच गॅस एजन्सीमार्फत सात हजार गॅस सिलिंडर रिफिल करण्याची व्यवस्था करण्‍यात आली आहे. तरडगाव, फलटण व बरड मुक्कामी १० गॅस एजन्सीमार्फत १२ हजार गॅस सिलिंडर रिफिल करण्याची व्यवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.