मंत्री नितीन गडकरी यांनी तत्त्वतः मान्यता देत निधी देण्याचं मान्य केलंय.
सातारा : कोल्हापूर- कागल राष्ट्रीय महामार्गाच्या (Kolhapur-Kagal National Highway) कामासाठी दोन हजार नऊ कोटी, खंबाटकी घाटातील (Khambatki Ghat) बोगद्यांच्या उर्वरित कामांसाठी ४९३ कोटींसह इतर कामासाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, प्रतापगड (Pratapgad), अजिंक्यतारा (Ajinkyatara), सज्जनगड रोप वेच्या (Sajjangad Ropeway) प्रस्तावाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तत्त्वतः मंजुरी देत निधी देण्याचे मान्य केले आहे.
या अनुषंगाने खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिल्लीत (Delhi) मंत्री गडकरी यांची भेट घेत चर्चा केली होती. या भेटीत उदयनराजेंनी महामार्गाचे सहापदरीकरण, बोगद्याचे काम, तसेच इतर कामांच्या अनुषंगाने चर्चा करत निधीची मागणी केली होती. याबाबतचे प्रस्ताव त्यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे सादर केले होते. त्यात प्रतापगड, अजिंक्यतारा, सज्जनगड येथील रोप वे प्रकल्पाचाही समावेश होता.
या प्रकल्पांना मंत्री गडकरी यांनी तत्त्वतः मान्यता देत निधी देण्याचे मान्य केल्याचेही उदयनराजे यांच्या वतीने देण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. कामाची निकड आणि आमची मागणी विचारात घेत नागरिकांच्या हितासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची उपलब्धता केल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.