ढेबेवाडी : मराठवाडी धरणांतर्गत जिंती(Jinti) (ता. पाटण) येथील धरणग्रस्तांच्या प्रलंबितप्रश्नी मंत्रालयात आयोजित केलेली बैठक ऐनवेळी रद्द केल्याने धरणग्रस्त नाराज झाले असून आठवडाभरात तातडीने बैठक(meeting) बोलावून अंतिम निर्णय न दिल्यास धरणाचे शेवटच्या टप्प्यातील बांधकाम (construction)रोखण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठवाडी प्रकल्पातील पुनर्वसनाचा बराच गुंता सुटलेला असला तरी काही कुटुंबांचे प्रश्न मात्र शासनाच्या ठोस निर्णयाअभावी वर्षानुवर्षे रखडत आहेत. त्यामध्ये जिंतीच्या धरणग्रस्तांचा प्रामुख्याने समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील पर्यायी जमिनी जिंतीच्या संबंधित खातेदारांना दाखवल्या असल्या तरी त्यांनी खडकाळ, मुरमाड व नापीक जमीन नाकारून इतर प्रकल्पग्रस्तांप्रमाणेच जमिनीऐवजी रोख रकमेची मागणी केली आहे. जिंती गावातील अन्य ६१ खातेदारांना शासनाने रोख रक्कम पॅकेजचा लाभही दिलेला असताना उर्वरित कुटुंबे मात्र त्यापासून वंचित आहेत. याबाबतचे प्रस्ताव त्यांनी वेळोवेळी सादर केलेले असतानाही त्यास नियामक मंडळाची मंजुरी मिळत नसल्याने पुढील हालचाली ठप्पच आहेत.
मराठवाडी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात हाच सर्वांत मोठा प्रश्न शिल्लक राहिलेला असून धरणाच्या अखेरच्या टप्प्यातील बांधकामाला त्यामुळे अडथळा येऊ शकतो. याप्रश्नी आमदार शशिकांत शिंदे यांनी लक्ष घालून बैठक बोलविण्याची मागणी पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मध्यंतरी केल्यानंतर २२ डिसेंबरला दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक बोलविण्यात आली होती. मात्र, बैठक रद्द झाल्याने धरणग्रस्तांच्या आशेवर पुन्हा पाणी फिरले. अधिवेशनाच्या कारणावरून रद्द केलेली ही बैठक आता परत कधी बोलविणार, याकडेच सर्वांचे लक्ष असल्याचे संदीप ढेब, अधिक सावंत या धरणग्रस्तांनी सांगितले. धरणाचे बांधकाम अखेरच्या टप्प्यात असताना ही दिरंगाई काही कामाची नाही. आठवडाभरात बैठकीबाबत अंतिम निर्णय न झाल्यास बांधकाम रोखण्याचा इशाराही त्यांनी दिला.(Satara News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.