Koregaon : पेशवेकालीन चिरेबंदी दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना, रेवडीचं म्हाळसाकांत मंदिर तुम्ही पाहिलंय?

हे मंदिर म्हणजे पेशवेकालीन चिरेबंदी दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते.
Koregaon Revadi Malhari Mhalsakant Temple
Koregaon Revadi Malhari Mhalsakant Templeesakal
Updated on
Summary

दक्षिण द्वारासमोर आकर्षक नंदीमंडप आहे. मंदिराचा मुख्य मंडप दगडी स्तंभावर आधारलेला आहे.

कोरेगाव तालुक्यातील रेवडी येथील श्री क्षेत्र मल्हारी म्हाळसाकांत मंदिर (Koregaon Revadi Malhari Mhalsakant Temple) हे भाविकांचे श्रद्धास्थान. हे मंदिर म्हणजे पेशवेकालीन चिरेबंदी दगडी बांधकामाचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. श्री खंडोबा देवस्थान म्हटले, की पाली, जेजुरी अशी मंदिरे पटकन नजरेसमोर येतात. असेच माहात्म्य रेवडीतील देवस्थानाला लाभले आहे.

वसना नदीकाठी असलेले हे गावचे ग्रामदैवत. वैशिष्ट्यपूर्ण बांधकामामुळे हे मंदिर ओळखले जाते. हे बांधकाम १७८५ ला पूर्ण झाले. ते आजही अत्यंत भक्कम आहे. मंदिरास पूर्व अन् दक्षिण बाजूस प्रवेशद्वार आहे. दक्षिण द्वारासमोर आकर्षक नंदीमंडप आहे. मंदिराचा मुख्य मंडप दगडी स्तंभावर आधारलेला आहे. गर्भगृह हे दक्षिणाभिमुखी आहे.

Koregaon Revadi Malhari Mhalsakant Temple
माणुसकी अजूनही जिवंत आहे! शेतकऱ्यांकडून कोणताही मोबदला न घेण्याचा ऊसतोड मजुरांचा निर्णय, सर्वत्र होतंय कौतुक

देवालयाभोवती मजबूत दगडी तटबंदी आहे. कोपऱ्यावर त्याला बुरुजाचे आकार दिलेले आहेत. पूर्वेकडील अरुंद जिन्यातून वर जाण्याची सोय आहे. मंदिर परिसरात भाविक, यात्रेकरूंसाठी लहान-मोठ्या ओवऱ्या बांधलेल्या आहेत. त्याचे नक्षीकामही अत्यंत सुबक, सुंदर ठरणारे आहे. मंदिरावर सुवर्ण कळस चढवलेला आहे.

मंदिर परिसरात दगडी दीपमाळा आहेत. दगडातच बनविलेले तुळशी वृंदावन आहे. देवालयाच्या आवारात मुख्य मंडपासमोर दगडी कासव आहे. इथे असलेला पाषाणातील दगडी हत्तीही लक्ष वेधून घेतो. गावात काही जुने, मोठे वाडेही पाहावयास मिळतात.

Koregaon Revadi Malhari Mhalsakant Temple
Loksabha Election : 'लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 400 खासदार निवडून येणार आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार'

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून येथील यात्रेला प्रारंभ होतो. यात्रा अन् विजयादशमीला विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहाने साजरे होतात. सातारा- लोणंद रस्त्यावर रेवडी गाव लागते. साताऱ्यातून सुमारे अर्धा तासात तिथे पोचता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.