VIDEO : नोटीस देवूनही आमच्या प्रश्‍नांकडं दुर्लक्ष केलं जातंय

Asha Workers Association
Asha Workers Associationesakal
Updated on

सातारा : कोरोना सर्व्हेसाठी (Corona Survey) दिवसाला ५० रुपये मोबदला देण्यात यावा. आशांना किमान १८ हजार रुपये वेतन द्यावे. गटप्रवर्तकांचा प्रवासभत्ता दुप्पट करा, यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हा आशा वर्कर्स संघटनेच्या (Asha Workers Association) वतीने नुकतेच जिल्हा परिषदेच्या मैदानावर निदर्शने करण्यात आली. तसेच, संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा (Officer Vinay Gowda) यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (Asha Workers Union Agitation At Satara Marathi News)

Summary

जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्याने पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला परवानगी नाकारल्याने काही काळ जिल्हा परिषदेच्याबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

संघटनेच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, माणिक अवघडे, कल्याणी मराठे, राणी कुंभार, सुवर्णा पाटील, पल्लवी नलावडे, रूपाली पवार, जयश्री काळभोर, रंजना फुले, रंजना पवार, शोभा कळंबे, मंगल जाधव, ज्योती यादव, सुवर्णा कदम, सुषमा अवकिरकर, उषा वेल्हाळ, विद्या कांबळे, पुष्पा मगर, सुमन वसव यांसह आशा व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्याने पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेसमोर आंदोलनाला परवानगी नाकारल्याने काही काळ जिल्हा परिषदेच्याबाहेर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर संतप्त आशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषद मैदानावर ठिय्या मांडला.

Asha Workers Association
काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे राजकारण; अध्यक्षपदावरून कलगीतुरा

याबाबत अवघडे म्हणाल्या,‘‘आशा व गटप्रवर्तकांना मास्क, सॅनिटायझर ही सुरक्षा साधने पुरेशा प्रमाणात पुरवावीत. गटप्रवर्तकांना झेरॉक्स, स्टेशनरीसाठी ५ हजार रुपये द्यावेत, गटप्रवर्तकांना २२ हजार रुपये किमान द्यावेत. आशा व गटप्रवर्तकांना एक हजार रुपये कोरोनासाठी ग्रामपंचायतीने द्यावेत आदी विविध मागण्यांसंदर्भात शासनाला एक महिना नोटीस देवूनही कोणतीही चर्चा न करता आमच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेले दीड वर्ष फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोनायोद्धा म्हणून जीव धोक्यात घालून समाजाची सेवा केली. तरीदेखील तुटपुंज्या मोबदल्यावर शासन राबवून घेत आहे.’’

Asha Workers Union Agitation At Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.