उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेताच आशा सेविका पुन्हा घराघरांत!

Asha Workers
Asha Workersesakal
Updated on

सातारा : गावागावांतील कोरोनाचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी आशा सेविका (Asha Workers) कार्यरत झाल्या असून त्यांनी पुन्हा एकदा घराघरांत जाऊन बाधितांसह इतरांची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे काम सुरू केले होते. हे काम करतानाच गावात नव्याने आलेल्यांच्या नोंदी ठेवत गृह विलगीकरणात असणाऱ्या बाधितांना ग्रामपंचायतींनी (Grampanchayat) उभारलेल्या विलगीकरण कक्षात पाठविण्याची प्राथमिक तयारी सुरू केली आहे. (Asha Workers Will Go Home Again And Check On Corona Patients In Satara)

Summary

शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार जोरात होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेस ग्रामस्तरावर योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले होते.

शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार जोरात होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा आढावा घेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Health Minister Dr. Rajesh Tope) यांनी आरोग्य यंत्रणेस ग्रामस्तरावर योग्य त्या उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली असून गावपातळीवर आशा सेविकांनी उपाययोजना राबविण्यावर भर दिला आहे. गावात असणाऱ्या बाधितांच्या नोंदी घेण्याबरोबरच त्यांच्या हालचालींवर लक्ष देण्यात येत आहे. कुटुंबनिहाय माहिती नोंदवून घेत सद्य:स्थितीत असणाऱ्या आजारी माणसांची, सुरू असणाऱ्या उपचाराची नोंदही घेण्याचे काम आशा सेविका करत आहेत.

Asha Workers
पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याची खरी माहिती समोर आली; डाॅक्टरांना चाप

जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीस लोकसंख्येच्या निकषावर विलगीकरण कक्ष उभारण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अनेक गावांनी तसे कक्ष विलगीकरण सुरू केले आहेत, तर अनेक गावांत त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हे कक्ष सुरू झाल्यानंतर गृह विलगीकरणात असणाऱ्या बाधितांना ग्रामपंचायतीने उभारलेल्या कक्षात दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी गावपातळीवर समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असून त्यात आशा सेविकांचा सहभाग असणार आहे. गावपातळीवरील कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची आगामी काळात प्रभावी अंमलबजावणी झाल्यास कोरोनावाढीचा आलेख आगामी काळात कमी होण्यास मदत होणार आहे.

Asha Workers
जिद्दीला सलाम! ..अखेर 108 वर्षांच्या आजोबांनी कोरोनाला हरवलंच

गावपातळीवरचे कक्ष आठवडाभरात कार्यरत

शासनाने दिलेल्या आदेशानुसार गावपातळीवर विलगीकरण कक्ष उभारण्यात येत आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी उभारलेले कक्ष कार्यरत झाले असून उर्वरित ग्रामपंचायतींच्याकडून त्यासाठीची कार्यवाही सुरू आहे. येत्या आठवड्यात हे सर्वच कक्ष कार्यरत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

Asha Workers Will Go Home Again And Check On Corona Patients In Satara

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.