जातीनिहाय जनगणना झाली, तर जाती-जातीत भांडणे होणार नाहीत : पटोले

जातीनिहाय जनगणना झाली, तर जाती-जातीत भांडणे होणार नाहीत : पटोले
Updated on

वाई (जि. सातारा) : जनगणना ही जातिनिहाय करणे आवश्‍यक आहे. जातीपातीतील संघर्ष टाळण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तो मी घेतला आणि विधानसभेला जातिनिहाय जनगणनेचे महत्व पटवून दिले, असे मत विधानसभेचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केले. 

श्री. पटोले खासगी दौ-यावर महाबळेश्वरला आले होते. मुंबईकडे जाताना ते सातारा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे यांच्या निवासस्थानी थांबले. या वेळी भारतीय किसान कॉंग्रेस मोर्चाचे उपाध्यक्ष शाम पांडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, किसन वीर कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पिसाळ, तालुका युवक अध्यक्ष प्रवीण अनपट आदी उपस्थित होते. या वेळी श्री. पटोले बोलत होते. जातीनिहाय जनगणना झाली तर सर्वसामान्यांना न्याय देणे शक्‍य होईल. जातीजातीत भांडणे होणार नाहीत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाला आरक्षणाचा लाभ देता येईल, असेही ते म्हणाले. 

ते म्हणाले, "लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न असेल, तसेच माझे अधिकार लोकांसाठी वापरून त्यांचा त्रास कमी करणार आहे. कोरोना प्रादुर्भाव नसता तर राज्यभरात जाण्याचे माझे नियोजन तयार केले होते. राज्याच्या विकासाची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली होती. राज्याचा स्थापनेनंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आदी ज्येष्ठ नेत्यांनी विपरीत परिस्थितीत आपल्या वैचारिक प्रबोधन व राज्यात मोठा विकास करून महाराष्ट्राला उभे करण्याचे काम केले. नवीन पिढीने, कार्यकर्त्यांनी हा इतिहास दुर्लक्षित करता कामा नये. मात्र, सद्या हा विकास दुर्लक्षित करून कॉंग्रेस पक्षाची निंदा करून पक्ष बदनाम करण्याचा प्रयत्न इतर पक्षाकडून सुरु आहे. कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन राज्य व देश विकासातील कॉंग्रेसचे योगदान लोकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे.'' विराज शिंदे यांनी वाई, खंडाळा, महाबळेश्वर येथील प्रलंबित प्रश्नांचा ऊहापोह केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()