"आई उदे ग अंबे उदे'चा औंधला जयघोष; रथोत्सव उत्साहात

"आई उदे ग अंबे उदे'चा औंधला जयघोष; रथोत्सव उत्साहात
Updated on

औंध (जि. सातारा) : संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध (ता. खटाव) येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक पौषी रथोत्सव मोजक्‍याच भाविक, ग्रामस्थांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. या वेळी "आई उदे ग अंबे उदे'चा जयघोष करण्यात आले.
 
औंध येथील श्री यमाईदेवीच्या रथोत्सवास शतकाहून अधिक वर्षांची परंपरा लाभलेली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्रीयमाई देवी मंदिरामध्ये श्री यमाईदेवीच्या उत्सव मूर्तीचे विधिवतपणे षोडषोपचारे पूजन करण्यात आले. देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभा मंडपात आणण्यात आली. या वेळी देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. गणेश इंगळे यांनी पौरोहित्य व मंत्रपठन केले. या वेळी दूध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृंदाच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. 

जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ..; कलाकारांची रसिक मायबापांना आर्त हाक

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते रथपूजन करून देवीची दुमजली रथात प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी माजी सभापती संदीप मांडवे, जितेंद्र पवार, सरपंच सोनाली मिठारी, हणमंत शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आतार, उपसरपंच दीपक नलवडे, सहायक पोलिस निरीक्षक उत्तम भापकर, पोलिस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, अमरसिंह देशमुख, शीतल देशमुख, वहिदा मुल्ला, शुभांगी हरिदास, वंदना जायकर, शाकिर आतार, गणेश देशमुख, तानाजी इंगळे, चंद्रकांत कुंभार, अनिल माने, इलियाज पटवेकरी, रमेश जगदाळे, नंदकुमार शिंदे, संजय निकम, अशोक देशमुख, दीपक कदम, उमेश थोरात, संजय यादव, गणेश हरिदास, श्रीपाद सुतार, वसंत जानकर, सदाशिव पवार, सुखदेव इंगळे, शहाजी यादव, भरत यादव, शैलेश मिठारी, रमेश चव्हाण, सचिन सूर्यवंशी, उमेश जगदाळे, भीमराव भोसले, संजय निकम, सदाशिव घाडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

काळूबाईच्या नावानं चांगभलं; थांबा! कूठे निघालात? मांढरगडावर... अहाे हे वाचा

त्यांनी सांगेल तसे तिने केले अन् ती फसली; बसला लाखभर रुपयांना गंडा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.