रामदास स्वामींची भेट घेणे आणि त्यांच्या मार्फतीने सुरत स्वारीतील संपदा परत मिळावी, अशी विनंती रामदास स्वामींद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना करणे हा त्या गुजराती बांधवांचा हेतू होता.
समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swamy) १६६३ मध्ये जेजुरी येथील खंडोबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. याठिकाणी त्यांना खंडोबाच्या मूर्तीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा दृष्टांत झाला. या दृष्टातांनंतर रामदास स्वामी हे सातारा येथे परतले. यावेळी वडनगर येथील काही गुजराती बांधव कीर्ती ऐकून रामदास स्वामी यांच्या भेटीसाठी आतुर होऊन मुक्कामी थांबले होते.
रामदास स्वामींची भेट घेणे आणि त्यांच्या मार्फतीने सुरत स्वारीतील संपदा परत मिळावी, अशी विनंती रामदास स्वामींद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना करणे हा त्या गुजराती बांधवांचा हेतू होता. साताऱ्यातील गुजराती बांधवांची रामदास स्वामी यांनी भेट घेतली. त्या बांधवांनी रामदास स्वामी यांना सुरत स्वारीमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगत त्यातून उभे राहण्यासाठी मदत व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना विनंती करण्यास सांगितले. यानुसार नंतरच्या काळात रामदास स्वामींनी त्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांना कल्पना दिली. यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गुजराती बांधवांना काही संपदा परत केली.
साताऱ्याच्या परिसराची या गुजराती बांधवांना भुरळ पडली व त्यांनी येथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थायिक झालेल्या गुजराती बांधवांपैकी लीलाधर गंगाधर गुजर यांना साताऱ्यात आल्यानंतर समर्थ रामदास स्वामींच्या सेवेचा मान मिळाला. सेवा करताना लीलाधर गंगाधर गुजर यांना प्रभू श्री रामचंद्रांचा दृष्टांत झाला. दृष्टांतावेळी त्यांना गुजरातमधील नर्मदा नदीच्या (Narmada River) डोहात मूर्ती सापडेल, असे संकेत दिले. यानुसार त्यांनी समर्थ रामदास स्वामींना त्याची कल्पना दिली. समर्थ रामदास स्वामींनी नंतर त्यांना नर्मदेच्या डोहात शोध घेण्याच्या सूचना केल्या. यानुसार नर्मदेचा डोह त्यांनी शोधण्यास सुरुवात केली. दोन दिवसांच्या शोधातून नर्मदेच्या डोहात काळ्या पाषाणसदृश मूर्ती सापडल्या.
पुढे याच मूर्ती रामदास स्वामी यांच्या हस्ते १६६५ मधील चैत्रशुद्ध गुढीपाडव्यादिवशी साताऱ्यातील मंगळवार पेठेतील मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आल्या. याच मंदिर परिसरात गुजराती बांधवांचे कुलदैवत श्री हटकेश्वर महादेवाचे मंदिर देखील आहे. त्याच्याच जवळ रामदास स्वामींची आठवण म्हणून दास मारुतीची देखील स्थापना करण्यात आली आहे. या मंदिरांतील नित्योपचार तसेच देवस्थान व्यवस्थापन लीलाधर गंगाधर गुजर यांची चौदावी पिढी सांभाळत आहे. यामध्ये रवींद्र पुरुषोत्तम शहा-गुजर व परिवाराचा समावेश आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.