Satara Politics : आम्हाला बेअक्कल म्हणता, मग लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर निशाणा

उदयनराजे व शंभूराज देसाई यांच्यात भांडण लावून आम्हाला काय फायदा?
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosaleesakal
Updated on
Summary

शिवतीर्थावरील बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकावरून जो काही प्रकार सुरू आहे तो ‘इगो’ वॉर आहे.

सातारा : शिवतीर्थावर लोकनेते बाळासाहेब देसाईंच्या स्मारकाला (Balasaheb Desai Memorial) खासदार उदयनराजेंचा विरोध नाही, असे सांगतात, तर समर्थकांना निवेदन द्यायला कशाला पाठवता? शंभूराज देसाईंचा (Shambhuraj Desai) वाईटपणा नको म्हणून स्मारकाला विरोध नाही, असे सांगता अन् शिवप्रेमींना वाईटपणा नको म्हणून तिकडे निवेदने द्यायला लावता.

एकाचवेळी सगळ्यांना खेळवायचा प्रयत्न चाललाय का तुमचा? अशी खोचक टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी उदयनराजेंवर (Udayanraje Bhosale) केली. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाविषयी भूमिका स्पष्ट केली.

आमदार भोसले म्हणाले, ‘‘लोकनेते बाळासाहेब देसाईंचे काम मोठे असून, याबाबत कुणाचेही दुमत नाही. पालकमंत्र्यांकडून लोकभावनेचा आदर ठेवला जाईल. शिवभक्तांचे म्हणणे विचारात घेऊन ते काम करतील. शहरात अन्य ठिकाणी लोकनेत्यांचे स्मारक करण्यास कुठलीही अडचण नसून, या प्रश्‍नांतून शंभूराज देसाईंनी मार्ग काढावा.’’

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Satara : उदयनराजेंशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण ते त्यांच्याच विश्वात असतात; शिवेंद्रराजेंनी उडवली खिल्ली

दरम्यान, उदयनराजे व शंभूराज देसाई यांच्यात भांडण लावून आम्हाला काय फायदा? असा प्रश्‍न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला. समाजात कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन येत नाही. उदयनराजेंना एवढा विश्‍वास आहे तर मग लोकसभेला नक्की काय झाले? आम्हाला बेअक्कल म्हणता तुम्ही एवढे विद्वान असता तर कसे काय लोकसभेला पडलात? तुम्ही एवढे महान कार्य केले, की तुम्हाला लोकांनी घरी बसवले?

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Sharad Pawar : प्रसारमाध्यमांकडं बातम्या आल्या म्हणजे..; सोलापूरच्या राष्ट्रवादीची भाकरी फिरवण्याला पवारांचा विरोध

चार महिन्यांत दोन लाख ८० हजारांच्या आघाडीवरून तुमचा ८० हजाराने पराभव का झाला? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शिवतीर्थावरील बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकावरून जो काही प्रकार सुरू आहे तो ‘इगो’ वॉर आहे. पालिकेतील सत्ता वाचविण्यासाठी शिवतीर्थाचा विषय हाती घेण्यात आला असून, पालिकेची निवडणूक झाल्यानंतर उदयनराजे शिवतीर्थाचा विषय घेणार नसल्याची टीका शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर केली.

Udayanraje Bhosale vs Shivendraraje Bhosale
Kolhapur : काँग्रेस-राष्ट्रवादीतील मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; महाडिकांनी टाकला बॉम्ब, राजकीय वर्तुळात चर्चा

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक अन्य ठिकाणी उभे करण्याची मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना करणार आहे.

- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.