'सरकारचा निर्णय चुकीचा; आषाढी वारीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा'

Bandatatya Karadkar
Bandatatya Karadkaresakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : मागील वर्षी कोरोनामुळे (Coronavirus) पादुका प्रथमच वाहनातून गेल्या. परिस्थितीचे गांभीर्य जाणून सांप्रदायाने निर्णय मान्य केला. मात्र, यंदाही सोहळा पायी जाऊ नये, असा निर्णय राज्य सरकारने एकतर्फी घेतला आहे. वारकरी सांप्रदायातील लोकांशी चर्चेचे नाटक करत सरकारने निर्णय कायम ठेवला. किमान १०० लोकांसह पादुका जाव्यात, या भावनेचाही त्यांनी चुराडा केला. त्यामुळे आषाढी वारीच्या पायी वारीसाठी (Ashadhi Ekadashi Wari) दोन जुलै रोजी वारकऱ्यांनी आळंदीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक बंडातात्या कऱ्हाडकर (Bandatatya Karadkar) यांनी केले आहे. (Bandatatya Karadkar Appeal To The Citizens To Participate In Pandharpur Ashadi Wari Satara Marathi News)

Summary

१९३३ मध्‍ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कॉलऱ्याच्या साथीमुळे इंग्रजांनी सोहळ्यावर बंदी घातली होती.

श्री. कऱ्हाडकर यांच्या आवाहनात म्हटले आहे की, ज्ञानोबारायांनी सातशे वर्षांपूर्वी सुरू केलेली सामूहिक दिंडी आजही अखंड व अभंग राहिली आहे. तुकोबारायांचे पश्चात महाराजांचे कनिष्ठ चिरंजीव नारायण महाराजांनी दिंडी समाजाचे संघटन केले. ज्ञानोबा-तुकोबारायांच्या पादुका पालखीतून नेत प्रतिवर्षी देहू-आळंदीमार्गे सोहळा चालू लागला. सोहळ्यात हैबतरावबाबाही चालत होते. १८३१ मध्ये वादातून सोहळा बंद पडला. त्याचे हैबतरावबाबांना वाईट वाटले. माऊलींच्या पादुका पंढरपूरला गेल्या नाहीत, ही खंत त्यांना वर्षभर राहिली. त्यांनी पुढील वर्षी १८३२ मध्ये प्रयत्न करून कर्नाटकातील अंकलीचे सरदार श्रीमंत शितोळे सरकार (Sardar Shrimant Shitole Sarkar) व वासकरांचे सहकार्याने आळंदी ते पंढरपूर स्वतंत्र पालखी (Alandi to Pandharpur) सोहळा सुरू केला. तो आजपर्यंत अव्याहत चालू आहे. १९३३ मध्‍ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कॉलऱ्याच्या साथीमुळे इंग्रजांनी सोहळ्यावर बंदी घातली.

Bandatatya Karadkar
दक्षिण काशी वाईतील श्री महागणपती (ढोल्या)

ज्ञानेश्वर महाराज संस्थानने पादुका रेल्वेने नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेव्हा शितोळे सरकारांनी अश्व पायी नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अभूतपूर्व असा सोहळा ज्ञानेश्वरी पालखीत चालला. तेव्हापासून २०२० पर्यंत तो अखंड चालतो आहे. कोरोनाचा संसर्ग अखंड महाराष्ट्रात असल्याने सरकारने पायी चालण्यास मनाई केली. परिस्थितीचे गांभीर्य जाणून सांप्रदायानेही निर्णय मान्य केला व पादुका प्रथमच वाहनातून गेल्या. मात्र, यंदा सोहळा पायी जाऊ नये, असा निर्णय सरकारने एकतर्फी घेतला आहे. तो चुकीचा आहे. ज्या कोरोनाचा दहशतवाद दीड वर्षे राबवण्यात आला. मुंबई-पुणे गर्दीची शहरे तुडुंब भरून वाहत आहेत. राजकीय मेळावे, विधानसभेची पोटनिवडणूक प्रचंड गर्दीत होते, राजकीय पक्षाच्या कार्यालयाचे उद्‌घाटन होत आहेत. सध्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचाराच्या सभा व जेवणावळी प्रचंड संख्येत होताना दिसतात. मात्र, मंदिरातील भजन, कीर्तने व दिंडी वाटचाल बंद आहे.

Bandatatya Karadkar
मानाच्या दहा पालख्यांत साताऱ्याच्या पाच विणेकरांचा समावेश

वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो, तर आता वाघ्या म्हणूनच अंगावर घेतला पाहिजे. म्हणून पायी दिंडीसाठी आळंदी येथे दोन जुलै रोजी वारकऱ्यांनी यावे.

-बंडातात्या कऱ्हाडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक, वारकरी सांप्रदाय

Bandatatya Karadkar Appeal To The Citizens To Participate In Pandharpur Ashadi Wari Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.