लोकप्रतिनिधी महिला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm Uddhav Thackeray) यांच्यासंदर्भाचत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या बंडातात्या कराडरकर यांच नाव चर्चेत आलं आहे. त्यांनी केलेल्या विधानांवरून सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, आज ज्येष्ठ किर्तनाकर बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) सातारा शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले आहेत. आज (बुधवार) पोलिसांनी बंडातात्यांना पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावले आहे. साधारणत: तीस मिनीटे ही चौकशी सुरु राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
मागील काही दिवसांपूर्वी किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्त्वव्यामुळं साताऱ्यासह (Satara) राज्यभारातून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी झाली. यानुसार त्यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. आज सातारा पोलिस (Police Station) स्थानकात त्यांची याविषयी चौकशी होणार आहे.
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात व्यसनमुक्त युवक संघ नुकत्याच केलेल्या आंदोलनानंतर बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांच्यावर दाोन गुन्हे दाखल झाले होते. कराडकर (bandatatya karadkar) यांनी ज्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच दिवशी ज्या वेळेस पोलिसांनी तपासासाठी माझी गरज भासेल त्या त्या वेळेस मी येईन असे वचन दिले होते. पोलिस ठाण्यात हजर राहून पोलिसांना सहकार्य करतील अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.