उदयनराजे स्वबळावर निवडणूक लढवणार?

राष्ट्रवादीत जागा मागणीवरून उफाळला वाद
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टातच सर्वकाही ढकलले जाणार आहे.

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांना सामावून घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress Party) कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे राजेंना गृहनिर्माण आणि दुग्ध संस्था मतदारसंघातून स्वत:च्या बळावर निवडून यावे लागण्याची शक्यता आहे. तर मजूर संस्थेतून अनिल देसाई यांच्या उमेदवारीला विरोध होऊ लागला असून, पालकमंत्र्यांनी विकास सेवा सोसायटीसह बॅंका व पतसंस्था, महिला राखीव आणि ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग अशा चार जागांवर हक्क सांगितला आहे. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा वाढल्याने आता याबाबतचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) कोर्टात जाणार आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अद्याप दिग्गज नेत्यांनी कोणीही अर्ज दाखल केलेले नाहीत. अर्जासाठी केवळ दोनच दिवस उरले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सोमवारी (ता. २५) अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त शोधला आहे. त्यातच संचालक मंडळाच्या जागा मागणीवरून राष्ट्रवादीतील नेत्यांत वाद उफाळून आला आहे. त्यामुळे काही विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देऊ नये, असा सूर आता निघू लागला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक सोपी करण्यासाठी सर्वसमावेशक पॅनेलचा फंडा काढला. त्यासाठी भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचे ठरले असले तरी पक्षातील प्रमुख नेत्यांकडून वाढीव जागांची मागणी झाल्याने जागा वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कोर्टातच सर्वकाही ढकलले जाणार आहे.

Udayanraje Bhosale
हिम्मत असेल तर माझ्या विरोधात निवडणूक लढवा

खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये सामावून घेण्याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांना विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी त्यांना स्वबळावर गृहनिर्माण आणि दुग्धसंस्था मतदारसंघातून निवडून यावे लागणार आहे. त्यासाठी मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे. तर मजूर संस्थेतून आजपर्यंत संचालक होत आलेल्या अनिल देसाई यांना राष्ट्रवादीतील एक-दोन आमदारांनी विरोध केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी दुसरा कोण उमेदवार दिला जाणार, हे ही महत्त्‍वाचे ठरणार आहे. सर्वधिक मते असलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाच जागांची मागणी केली आहे. त्यांनी महिला राखीव, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि कृषी प्रक्रिया अशा पाच जागांची मागणी केली आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चार जागांची मागणी केली आहे.

Udayanraje Bhosale
राष्ट्रवादीवर टीका कराल, तर जागा दाखवून देऊ : आमदार शिंदे

यामध्ये त्यांच्या कऱ्हाड सोसायटीसह महिला राखीव, बॅंका, पतसंस्था मतदारसंघ स्वत:च्या भावासाठी तसेच राखीवमधील ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील जागांची मागणी त्यांनी केली आहे. तर आमदार मकरंद पाटील व त्यांचे बंधू विद्यमान संचालक नितीन पाटील यांनाही आणखी एखादी जागा वाढवून हवी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्येच जागा मागणीवरून वाद वाढला आहे. हा वाद मिटविण्यासाठी सर्वजण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे जाणार आहेत. त्यातूनही तोडगा निघाला नाही तर अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे जागा वाटपाचा पेच जाणार आहे. दरम्यान, येत्या सोमवारी (ता. २५) राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अर्ज भरण्याचा मुहूर्त काढला असून सर्व दिग्गज नेते त्याच दिवशी अर्ज भरणार आहेत.

Udayanraje Bhosale
ठरलं! शिवेंद्रसिंहराजेंना घेऊनच NCP चे पॅनेल

संचालक होण्यासाठी महिलांमध्ये चुरस...

महिला राखीवमधून इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. विद्यमान संचालिका कांचन साळुंखे, तसेच प्रभाकर घार्गे यांची पत्नी इंदिरा घार्गे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची पत्नी स्मितादेवी देसाई, वसंतराव मानकुमरे यांची पत्नी जयश्री मानकुमरे, राजेश पाटील-वाठारकर यांची पत्नी ऋतूजा पाटील-वाठारकर, रवींद्र कदम यांची पत्नी जयश्री कदम, खासदार उदयनराजेंच्या कोट्यातून गितांजली कदम यांची नावे इच्छुकांमध्ये आहेत. येत्या दोन दिवसांत या सर्व इच्छुक महिला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत महिला राखीवमधून दीपाली विश्वास पाटील यांचा अर्ज दाखल झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.