NCP आमदाराच्या अडचणीत वाढ; जावळीतून BJP आमदाराच्या समर्थकांचे अर्ज

जावळी सोसायटीतून रांजणे, महाडिक, पोळसह इंदिरा घार्गेंचा अर्ज दाखल
Satara Bank Election
Satara Bank Electionesakal
Updated on
Summary

बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आता फक्त दोनच दिवस उरलेले आहेत.

सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी तब्बल १७ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले. यामध्ये जावळी सोसायटीतून ज्ञानदेव रांजणे, कोरेगावातून शिवाजीराव महाडिक, खटावमधून इंदिरा घार्गे, माणमधून मनोज पोळ यांच्यासह राखीव व संस्था मतदारसंघातील अर्जांचा समावेश आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालचा चौथा दिवस असून, आता केवळ दोन दिवस उरलेले आहेत. त्यामुळे आगामी दोन दिवसांत अनेक दिग्गज नेते अर्ज दाखल करणार आहेत. 25 ऑक्टोबरला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अर्ज दाखल करणार आहेत. आज अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये जावळी सोसायटीतून ज्ञानदेव किसन रांजणे यांचे तीन अर्ज, कोरेगाव विकास सोसायटीतून शिवाजीराव महाडिक यांचे दोन अर्ज, खटाव सोसायटी मतदारसंघातून प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे यांचे दोन अर्ज, माण सोसायटीतून मनोज सदाशिव पोळ यांच्या अर्जाचा समावेश आहे.

Satara Bank Election
ठरलं! शिवेंद्रसिंहराजेंना घेऊनच NCP चे पॅनेल

महिला राखीवमधून शशिकला जाधव-देशमुख (खटाव) यांचे दोन अर्ज, जयश्री वसंतराव मानकुमरे (जावळी), विश्रांती विजय देशमुख (पाटण). अनुसूचित जाती प्रवर्गातून मधूकर ज्ञानदेव भिसे, सुरेश बापू सावंत, इतर मागास प्रवर्गातून पांडुरंग बबन शिरवाडकर, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गमधून तात्यासाहेब आबाजी धायगुडे, भागुजी विठ्ठल शेळके, जोतिराम बापूराव अवकीरकर यांच्या अर्जाचा समावेश आहे. नागरी बॅंका व पतसंस्था मतदारसंघातून मनोहर वसंतराव बर्गे, सौरभ राजेंद्र शिंदे, मिलिंद तानाजी पाटील यांच्या अर्जाचा समावेश आहे. काल दिवसभरात १७ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले आहेत.

Satara Bank Election
उदयनराजे स्वबळावर निवडणूक लढवणार?

आमदार शिंदेंची अडचण वाढली

जावळी विकास सेवा सोसायटीतून आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) हे संचालक आहेत. याच मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे (MLA Shivendrasinharaje Bhosale) समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी आज अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आमदार शिंदेंपुढे आव्हान निर्माण झाले, तर माणमधून मनोजकुमार पोळ यांनी अर्ज दाखल केल्याने आमदार जयकुमार गोरेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून पोळ लढणार आहेत, तसेच विद्यमान संचालक प्रभाकर घार्गे यांनी आपली पत्नी इंदिरा घार्गे यांना खटाव सोसायटीतून अर्ज भरला आहे. बॅंकेचे तज्ज्ञ संचालक वसंतराव मानकुमरे यांची पत्नी जयश्री मानकुमरे यांचा महिला राखीवमधून अर्ज दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.