'उलट त्‍यांनी म्‍हटलं पाहिजे, कोणी नसलं तरी चालेल; पण उदयनराजे सोबत हवेत'

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

जनता, मतदारांना मी हवाय. चांगल्‍या लोकांना त्रास होऊ नये, यासाठी मी गरजेचा आहे.

सातारा : सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) पुण्‍यात बैठक झाल्‍याचे माझ्‍या वाचनात आले. मला वाटते ती सातारा जिल्‍हा नव्‍हे, तर पुणे जिल्‍हा बँकेसाठी (Pune District Bank) झाली असावी. जिल्ह्यातील निर्णय जिल्ह्यातच झाले पाहिजेत. काही जणांना वाटते म्‍हणून मी त्‍यांना बँकेत नकोय. मला वाटते या प्रक्रियेत मतदार महत्त्‍वाचा. अर्ज भरण्‍यास एक दिवस बाकी आहे. मी मतदारांना विचारणार. त्‍यांना त्रास होऊ नये, म्‍हणून चांगल्‍या बँकेत मी त्‍यांना हवा आहे. त्‍यांनी भरा म्‍हटले तर अर्ज भरणार, असे वक्‍तव्‍य खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी येथील पत्रकार परिषदेत केले.

उदयनराजे म्‍हणाले, ‘‘मी त्‍यांना का नकोय हे मलाच समजेना. उलट त्‍यांनी म्‍हटले पाहिजे. कोणी नसले तरी चालेल; पण उदयनराजे सोबत हवेत. अहो म्‍हणा की तेवढे, वरवर म्‍हणा. काय पैसे पडतायत म्‍हणायला. काही जणांना मी नकोय; पण जनता, मतदारांना मी हवाय. चांगल्‍या लोकांना त्रास होऊ नये, यासाठी मी गरजेचा आहे. विचारा जनतेला. नुकतेच सातारा जिल्‍हा बँकेबाबत पुण्‍यात बैठक झाल्‍याचे माझ्‍या वाचनात आले. राज्‍यात अनेक बँकांच्‍या निवडणुका सुरू आहेत. त्‍या- त्‍या ठिकाणी त्‍या- त्‍या बँकेच्‍या निगडित बैठकी होतात. सांगलीची सांगलीत, कोल्हापूरची कोल्‍हापुरात. पुण्‍यात झालेली बैठक पुणे जिल्‍हा बँकेची होती. आपली बैठक कुठे झालीय. ती सातारा येथेच होणार. जिल्‍ह्याचे निर्णय जिल्ह्यातच व्‍हायला हवेत. हो नाही तर बैठक घेऊन ते जिल्ह्याचे नाव पण बदलतील.’’

Udayanraje Bhosale
कांटे की टक्कर; भाजपच्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीनं शोधला उमेदवार

आपली भूमिका काय राहणार आणि अर्ज कधी भरणार याबाबत विचारले असता, ते म्‍हणाले, ‘‘सगळेच आता जाहीर केले तर ते मला अधिक चांगल्‍या पद्धतीने जगू देतील. वेळ आहे अजून. बघू की काय काय होतेय. मतदार महत्त्वाचा. त्‍यांना विचारणार, त्‍यांनी सांगितले निवडून देतो, तरच अर्ज भरणार. त्‍यांनी सांगितले नको, तर नाही भरणार.’’ इतरांना मात्र अतिप्रचंड वेगाने तयारी करावी लागेल, असे सूचक वक्‍तव्‍यही त्‍यांनी या वेळी केले.

Udayanraje Bhosale
NCP आमदाराच्या अडचणीत वाढ; जावळीतून BJP आमदाराच्या समर्थकांचे अर्ज

तर मागेच ऑफ झालो असतो

बारामतीला लखोटा नेणारे आणि तिथून आणणाऱ्यांना तुम्‍ही नकोय, या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर उदयनराजे म्‍हणाले, ‘‘लखोटा संपला. आता ईमेल आहे. पाठवायचा आणि बघायचा. अगोदर लखोटा यायचा; पण अदृश्‍य असायचा. तो एकालाच दिसायचा. आम्‍ही बघायला मागितला तर दिसायचा नाही. चॅटिंगमुळे काय होत, माहीत आहे ना. आपण नाही त्‍या भानगडीत. आपला फोन साधा डबडा आहे. फक्‍त ऑन आणि ऑफ.’’ चॅटिंग-सेटिंगच्‍या नादात असतो, तर मागेच ऑफ झालो असतो, असे त्‍यांनी या वेळी सांगितले.

Udayanraje Bhosale
वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे; उदयनराजेंचा अजित पवारांवर संताप

माझ्‍यामुळेच चौघांना संधी

प्रत्‍येक वेळी मीच, मीच. अशी सारखी मीचमीच करतात ना तेच म्‍हणतात मीच, मीच. माझे म्‍हणणे प्रत्‍येकाला संधी मिळाली पाहिजे. मी भूमिका घेतल्‍यानेच न होणारे चार जण चेअरमन झाले. मी नसतो तर त्‍यांना आयुष्‍यात चेअरमन होता आले नसते. त्‍यांनी कधीच मान्‍यता मिळाली नसती, असेही त्‍यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Udayanraje Bhosale
मला कोणाला मोठं करणं पसंत नाही : उदयनराजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.