कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब पाटील बिनविरोध होतील, असे अनेकांना वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही.
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election 2021) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Nationalist Congress Party) सर्वसमावेशक पॅनेलचे नाव सहकार पॅनेल असून ‘कप बशी’ हे चिन्ह आहे, अशी घोषणा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar) यांनी काल व्हिडिओ कॉलवरून घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, आमचे 11 संचालक बिनविरोध आले असून उर्वरित संचालकही निवडून येतील. त्यासाठी आमची तयारी सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), आमदार शिवेंद्रसिंहराजे, आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, नितीन पाटील त्याचबरोबर अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी रामराजेंनी पॅनेलची घोषणा करताना उमेदवारांची नावे सांगितली. त्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना दुसऱ्यांदा संधी का दिली नाही, याविषयी पालकमंत्र्यांनी अधिक बोलणे टाळले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे मकरंद पाटील यांनी सांगत या विषयाला बगल दिली.
कऱ्हाड सोसायटी मतदारसंघातून बाळासाहेब पाटील बिनविरोध होतील, असे अनेकांना वाटले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही, याची कारणमीमांसा विचारली असता त्यांनी अधिक भाष्य केले नाही. 'महिला राखीव'च्या उमेदवारीवरून वादावादी झाल्याचे निदर्शनास आणून दिले असता ‘असे काहीही झालेले नाही’ असे पालकमंत्र्यांनी सांगितले. त्यावर मकरंद पाटील म्हणाले, ‘महिला राखीव’मधून सातारा तालुक्यातून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा निर्णय संबंधित तालुक्यानेच घ्यायचा होता. त्यामुळे तेथे वादावादी झाली अथवा वादंग झाले, असे म्हणणे योग्य होणार नाही.’’ खटाव सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या उमेदवारीविषयी विचारले असता त्यावरही दोघांनीही बोलणे टाळले.
कऱ्हाड तालुका मोठा असून माझ्या उमेदवारीचा निर्णय सर्वांच्या विचाराने घेतला आहे. माझ्यासाठी तालुक्याने निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मला निवडणूक लढणे भाग पडले.
-बाळासाहेब पाटील, सहकारमंत्री तथा पालकमंत्री
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.