कऱ्हाड : पंतप्रधानांनी देशात विरोधकच नाहीत असे जाहीर केले होते. तरीही आपच्या केजरीवाल यांनी दोन वेळा दिल्लीत भाजपला भुईसपाट केले, चार राज्यात कॉंग्रेसची सत्ता आली. कॉंग्रेसमधुन गेलेली अनेक माणसे विरोधी पक्षात आहेत.
मात्र आमच्या कॉंग्रेस पक्षाकडे धुलाई मशीन नाही तर वैचारीक अधिष्ठान आहे. येणाऱ्या निवडणुकीत देशातील, महाराष्ट्रातील जनता आपली चिढ दाखवुन देईल, असा विश्वास आमदार भाई जगताप यांनी आज येथे व्यक्त केला.
सातारा लोकसभा मतदार संघातील आढावा बैठकीसाठी कॉंग्रेसच्या सातारा जिल्हा मतदार संघाचे निरीक्षक आमदार जगताप हे आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,
युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला अध्यक्षा अल्पना यादव, कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, उत्तरचे अध्यक्ष निवासराव थोरात,
आमदार जगताप म्हणाले, कॉंग्रेस पक्षाच्या लोकसभा मतदार संघातील उमेदवार निवडीसाठी कॉंग्रेसने आढावा बैठकींचे आय़ोजन केलेले नाही तर त्या लोकसभा मतदार संघातील लोकांच्या भावना जाणुन घेण्यासाठी बैठक घेत आहोत.
कऱ्हाडच्या कार्यकर्त्यांनी अधिक भावनिक होवुन कार्यकर्त्यानी चर्चा केली. त्यातुन एक वेगळी उर्जा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत दिसुन येत आहे. १५ ऑगस्टला आम्ही आमचा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत. कॉंग्रेसचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये सदस्य जास्त आहेत. त्यातील अनेक ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता आहे.
ते म्हणाले, कॉंग्रेस पक्षातुन गेलेली अनेक माणसे विरोधी पक्षात आहेत. मात्र धुलाई मशीन आमच्याकडे नाही. आमच्या कॉंग्रेस पक्षाकडे वैचारीक अधिष्ठान आहे. त्यामुळे कर्नाटकात कॉंग्रेची सत्ता आली.
येणाऱ्या निवडणुकीत देशातील, महाराष्ट्रातील जनता आपली चिढ दाखवुन देईल. लोकांच्या मनात भाजपच्या विरोधात प्रचंड चीड आहे. ती चीढ कर्नाटकात दिसली आणि महाराष्ट्रातही दिसेल. पंतप्रधान यांनी सत्तेत आल्यापासुन दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत.
आम्ही सत्तेवर आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधीचा परदेशातील काळा पैसा आणु असे सांगितले. काळा पैसा आलाच नाही उलट त्यांचे तोंड काळे झाले. छोटे पक्ष संपवण्यासाठी भाजपची रणनिती सुरु आहे का या प्रश्नावर ते म्हणाले, पंतप्रधान यांनी देशात विरोधकच नाहीत असे जाहीर केले होते.
तरीही आपच्या केजरीवाल यांनी दोन वेळा भाजपला भुईसपाट केले आहे. विरोधक नाहीत म्हणता मग कॉंग्रेसची चार राज्यात सरकार कसे येते. पंतप्रधानांनी सांगीतलेली, घोषणा केलेली एकही गोष्ट पुर्ण झालेली नाही. त्यामुळे लोकांच्यात त्याच्याबदद्द चिढ आहे. सध्या मुंबईत कॉंग्रेसचे एक नंबरवर असेल मला खात्री आहे. कारण देशाचा वैभव, विकास हा सर्वधर्मसमभाव कॉंंग्रेसकडे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.