Bharat Band Updates : कृषी विधेयकाविरोधात पुकारलेल्या 'भारत बंद'ला कऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद

Bharat Band Updates : कृषी विधेयकाविरोधात पुकारलेल्या 'भारत बंद'ला कऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद
Updated on

कऱ्हाड  (जि. सातारा) : केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आज (मंगळवारी) कऱ्हाड शहरासह तालुक्यात प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत शहरातील बाजारपेठा बंद होत्या. बाजार समितीतील शेतमालाची उलाढालही ठप्प झाली होती.

केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्याच्या विरोधासाठी पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि कृषी विधेयकाविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला प्रतिसाद देण्यासाठी आज शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. बळीराजा शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, किसान महासभा, बहुजन क्रांती मोर्चा यासह अन्य संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅली आझाद चौक, कन्याशाळेसमोरुन कृष्णा नाका मार्गे बस स्थानकासमोरुन दत्त चौकातून प्रशासकीय इमारतीपुढे नेण्यात आली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.