राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमधून सत्यजितसिंह पाटणकर हे निवडणूक लढत आहेत.
सातारा : पाटण सोसायटी मतदारसंघात (Patan Society Constituency) विरोधकांकडून पैसा किंवा सत्तेचा वापर केला जाणार आहे. मात्र, पाटण तालुक्यातील सोसायटींचे प्रतिनिधीत्व करणारे जे मतदार आहेत. ते पैशापुढे आणि सत्तेच्या ताकदीपुढे कधीही झुकणार नाहीत. सर्वसामान्यांची ताकद या निवडणुकीत त्यांना दिसून येईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsingh Patankar) यांनी व्यक्त केला. पाटण सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलमधून सत्यजितसिंह पाटणकर हे निवडणूक लढत आहेत. त्यांच्याविरोधात गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचं आव्हान आहे.
पाटणकर म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेत पाटण सोसायटी (Patan Society Election) मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) करत आला आहे. यापुढेही हीच परंपरा पुढे चालत राहणार आहे. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आजपर्यंत आम्ही जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या आहेत. काही नवीन योजना, तसेच शेती व्यवसायाला ताकद देण्यासाठी विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी सभासदांना मदत केली आहे. शेती व्यवसाय व शेतकऱ्यांना ताकद देणे ही आमची या निवडणुकी मागची भूमिका आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी आम्ही लढा उभा केला आहे. आजपर्यंत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर (Vikramsingh Patankar) यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलंय. त्यांची विकासकामांची आणि शेतकऱ्यांना ताकद देण्याची परंपरा यापुढेही मी चालविणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
पाटण सोसायटी मतदारसंघात गृहराज्यमंत्र्यांचे आव्हान तुमच्यापुढे आहे, त्यांच्याकडे सत्तेची ताकद तर तुमच्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांची ताकद आहे. त्यामुळे या लढतीकडे तुम्ही कसे पाहता, यावर पाटणकर म्हणाले, ‘सहकारात काम करताना सहकारी सोसायटींचे बहुमत महत्त्वाचे आहे. आमच्याकडे पाटण तालुक्यातील सोसायटींचे बहुमत आहे. त्यांच्याकडून या निवडणुकीत पैसा किंवा सत्तेचा वापर करण्याचा प्रयत्न केला, तरी पाटण तालुक्यातील सोसायटींचे प्रतिनिधीत्व करणारे जे मतदार आहेत. ते पैशापुढे आणि सत्तेच्या ताकदीपुढे कधीही झुकणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.