Loksabha Election : उदयनराजेंनी वाढदिनी फुंकले रणशिंग; लोकसभेला जनतेतून निवडून जाण्याची व्यक्त केली इच्छा

निवडणूक लढवावी, ही प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. त्यात गैर काहीही नाही.
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

'छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना, सर्वधर्म समभावाच्या विचाराने मी वाटचाल केली आहे. देश अखंड ठेवायची प्रत्येकाची जबाबदारी आहे.'

सातारा : निवडणूक लढवावी, ही प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. त्यात गैर काहीही नाही. त्यानुसार आपणही लोकांच्या माध्यमातून ‘त्या’ सभागृहात जावे, असे मला वाटते, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आपण सातारा लोकसभेची निवडणूक (Satara Loksabha Election) लढण्यास तयार असल्याचे संकेत वाढदिनी दिले. जलमंदिर पॅलेसला पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Eknath Shinde) शुभेच्छा देण्यासाठी येत असल्याबद्दल उदयनराजेंनी हा त्यांचा मोठेपणा आहे, असे स्पष्ट केले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेस (Jalmandir Palace) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी येथील भवानीमातेचे दर्शन घेतले. त्यानंतर राजमाता कल्पनाराजे भोसले व दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

MP Udayanraje Bhosale
Udayanraje Birthday : उदयनराजेंचं व्यक्तिमत्त्व राजबिंडे असले, तरी त्यात राजेपणाचा उन्माद कधीच दिसणार नाही!

वाढदिवसानिमित्त काही संकल्प केला आहे का? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ‘‘संकल्प केवळ वाढदिवसापुरता मर्यादित नसतो. सर्वसामान्य माणसाला समोर ठेऊन मी वाटचाल केली आहे. कधीही राजकारण केलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची कल्पना, सर्वधर्म समभावाच्या विचाराने मी वाटचाल केली आहे. देश अखंड ठेवायची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण बंधुत्वाच्या भावनेतून राहणे गरजेचे आहे. नाहीतर युनाटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेप्रमाणे आपल्याकडे होऊ नये, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.’’

MP Udayanraje Bhosale
...अन् मनोहर जोशींनी स्थापन केले 'कृष्णा खोरे'; 'या' पाच अपक्ष आमदारांना दिलेला शब्द केला खरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुभेच्छा देण्यासाठी जलमंदिर पॅलेस येथे येत आहेत, ते काय घोषणा करतील का? यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री काय घोषणा करतील मला माहिती नाही; पण ते येथे येत आहेत, हा त्यांचा मोठेपणा आहे. आमचे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध आहेत. आता जरी ते मुख्यमंत्री असले तरी आमदार असल्यापासूनचे आमचे संबंध आहेत.

MP Udayanraje Bhosale
बेडगमध्ये आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडली, त्यामुळं दलित-अल्पसंख्याकांवर अन्याय सुरु; कवाडेंचा आरोप

महाबळेश्वरला नाट्यपरिषद होत आहे. त्यामुळे ते येत होते, त्यांना आम्ही भेटण्यास येण्याची विनंती केली होती. त्यानुसार ते येत आहेत.’ वाढदिवसाच्या निमित्ताने तुमची सातारा लोकसभा निवडणुकीच्या मोहिमेस सुरुवात केली, असे म्हणता येईल का? यावर उदयनराजे म्हणाले, ‘‘मोहीम सुरू झाली म्हणता येईल. निवडणूक लढावी, ही प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. त्यात गैर काहीही नाही. वाटतं की आपणही लोकांच्या माध्यमातून ‘त्या’ सभागृहात जावे,’’ असे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.