Talathi Exam : अंध तरुणांची तलाठी परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी; अंध गुरूच्याच मार्गदर्शनाने मिळाली नवी दिशा

अंधत्वामुळे शिक्षणात दैनंदिन जीवन जगताना, येणाऱ्या अडचणींची गजानन यांना जाण होतीच.
Talathi Exam
Talathi Examesakal
Updated on
Summary

अनेक प्रश्‍न असताना जिद्दीच्या जोराव तलाठी परीक्षेत (Talathi Exam) ते उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश मिळविले.

वाई शहर : वाई तालुक्यातील परतवडीचा संजय बाळू जाधव, वयगावचा रूपेश बाळू वाडकर या अंध तरुणांनी समोर दारिद्र्याचा अंधार... अनेक प्रश्‍न असताना जिद्दीच्या जोराव तलाठी परीक्षेत (Talathi Exam) उत्तीर्ण होऊन नेत्रदीपक यश मिळविले. त्यासाठी त्यांना पूर्वी शिकवत असलेले अंध शिक्षक (Blind Teacher) गजानन दीक्षित यांची प्रेरणा आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले.

दीक्षित हे कंत्राटी शिक्षक म्हणून कार्यरत असताना हे विद्यार्थी त्यांच्या संपर्कात आले. दीक्षित सध्या वस्तू व सेवा कर निरीक्षक पदावर कार्यरत असले, तरी विद्यार्थीप्रती असलेली निष्ठा बदलली नाही. त्या अंध गुरूचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकून गेले.

Talathi Exam
Kolhapur : वादग्रस्त मदरशा इमारत मुस्लिम समाजानं उतरवली; 'लक्षतीर्थ'ला पोलिस छावणीचं स्वरूप, ठिकठिकाणी नाकाबंदी

गजानन सुधाकर दीक्षित हे समग्र शिक्षा अभियानांतर्गत २००६ पासून वाई पंचायत समितीतर्फे अंध विद्यार्थ्यांचे विशेष शिक्षक म्हणून पूर्णतः अंध व फिरते (मोबाईल) शिक्षक कंत्राटी तत्त्वावर कार्यरत होते. ज्या शाळेत अंध विद्यार्थी असतील; त्या शाळांवर जाऊन या विशेष गरजा असलेल्या या विद्यार्थ्यांना ते शिकवायचे, तेही ८-१५ दिवसांतून अवघा एक दिवस.

Talathi Exam
Hindu Marriage Act : हिंदू विवाह कायद्यातील दुरुस्तीला सरकारची मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

अंधत्वामुळे शिक्षणात दैनंदिन जीवन जगताना, येणाऱ्या अडचणींची गजानन यांना जाण होतीच. शिक्षक म्हणून शिकवताना त्यांच्यात विद्यार्थ्यांबद्दल कणव निर्माण झाली. त्यातून विद्यार्थी- शिक्षकांमध्ये जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, पालकांची गरिबी, अशिक्षित किंवा अल्पशिक्षितपणा, उदासीनता त्यांच्या लक्षात आली.

शासनाकडून ब्रेल लिपीतील तुटपुंजी शैक्षणिक साधने, क्रमिक पुस्तके कधीमधी मिळायची. त्यांच्या मदतीने गजानन दीक्षित विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा द्यायचे. मात्र, मार्गदर्शन, अध्यापन आंतरिक जिव्हाळ्याने करायचे. विशेष गरजा असलेली दिव्यांग मुले कशीबशी शिकत, अभ्यास करत पुढे जात राहिली.

Talathi Exam
'संजीवराजेंना खासदारकीचं तिकीट मिळालं नाही, तर तुम्हालाही तिकीट मिळून देणार नाही'; रामराजेंचं कोणाला चॅलेंज?

गुरू शिष्याची नाळ कायम

२०१७ मध्ये समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी शिक्षक असलेले गजानन दीक्षित हे वस्तू व सेवा कर निरीक्षक म्हणून स्पर्धा परीक्षेतून, नव्या नोकरीत सातारा येथे रुजू झाले. मात्र, तरीही त्यांनी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून व थोड्याफार प्रत्यक्ष संपर्क ठेवला. मार्गदर्शन करीत राहिले. गुरू-शिष्य नात्याची नाळ तुटू दिली नाही. स्वतःला स्पर्धा परीक्षेतून गवसलेली दिशा ते विद्यार्थ्यांना दाखवत राहिले. यातूनच अन् संजय जाधव व रूपेश वाडकर या अधूदृष्टी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतून थेट तलाठी पदाला गवसणी घातली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.