मुंबई-गोवा व चिपळूण मार्गावर (Mumbai-Goa and Chiplun Road) खड्डे आणि मोठी वाहतूक असल्याने अनेक मुंबईकरांनी हा या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला.
खंडाळा : उद्याच्या गणेशोत्सवासाठी (Ganeshotsav) कोकणात निघालेले चाकरमानी खंबाटकी घाटात अडकले असून, सकाळी सहा वाजेपासून पुण्याहून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीये. तसेच रात्री एक ते चार दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे खंबाटकी घाटातून (Khambatki Ghat) जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.