गोंदवले : पक्षीसप्ताहात पक्षीनिरीक्षण, वनभ्रमंतीसह पक्ष्यांची गणना

गोंदवले : पक्षीसप्ताहात पक्षीनिरीक्षण, वनभ्रमंतीसह पक्ष्यांची गणना
Updated on

गोंदवले (जि. सातारा) : पक्ष्यांची जैवविविधता घटत असल्याने पक्ष्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोचवून त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने राज्यात आजपासून (ता. पाच) 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षीसप्ताह साजरा होत आहे. या निमित्ताने किरकसालसह विविध ठिकाणी पक्षीनिरीक्षण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती किरकसाल जैवविविधता समितीचे अध्यक्ष अमोल काटकर यांनी दिली. 

महाराष्ट्र राज्यातील वन्यजीव विषयक साहित्यनिर्मितीत अग्रणी असणारे साहित्यिक व सेवानिवृत्त वनाधिकारी अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस पाच नोव्हेंबर असून, भारतीय पक्षीविश्व व पक्षी अभ्यासशास्त्रास जागतिक स्तरावर पोचवणारे पद्मभूषण डॉ. सलीम अली यांची जयंती 12 नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे पाच ते 12 नोव्हेंबर हा आठवडा पक्षीसप्ताह साजरा करण्यात येणार असून, असा सप्ताह साजरा करणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत आहे. या पार्श्वभूमीवर किरकसालमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

फलटणच्या तब्बल 12 पेट्रोलपंपांना मंजुरी; पुसेगाव, वाखरीसह 22 गावांना लाभ 

आज (गुरुवार) सकाळी पक्षीसप्ताहाचे उद्‌घाटन झाल्यावर चोरमले दरा परिसरात पक्षीनिरीक्षण होईल. स्लाइड शोच्या माध्यमातून किरकसालचे पक्षीवैविध्य याबाबत मार्गदर्शन होईल. माण तालुक्‍याची पक्षीगणना, संवर्धन व संरक्षण या विषयावर चर्चासत्र होईल. शुक्रवारी (ता. सहा) शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागात वाघजाई तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण होईल. शनिवारी (ता. सात) येरळवाडी धरण (ता. खटाव) येथे पाणपक्ष्यांचे निरीक्षण होईल. रविवारी (ता.आठ) शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व गावातील विविध अधिवासातील पक्ष्यांची पोस्टरद्वारे माहिती दिली जाईल. सोमवारी (ता. नऊ) पिंगळी तलाव परिसरात पक्षीनिरीक्षण केले जाईल. मंगळवारी (ता. दहा) दहिवडी वनपरिक्षेत्रातील वनरक्षक व वन कर्मचाऱ्यांसाठी पक्षीनिरीक्षण व ई-बर्डविषयक कार्यशाळा होईल. बुधवारी (ता. 11) नळीचा माळ परिसरात पक्षीनिरीक्षण व वनभ्रमंती होईल. गुरुवारी (ता. 12) मायणी पक्षी अभयारण्यात (ता. खटाव) पक्षीनिरीक्षण व "ई-बर्ड' नोंदणी करून पक्षीसप्ताचा समारोप होईल. या कार्यक्रमांमध्ये दहिवडी वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. मुळे, पक्षीमित्र चिन्मय सावंत, विशाल काटकर यांच्यासह वन विभागाचे कर्मचारी व जैवविविधता समितीचे सदस्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. 

आता दरवर्षी नोव्हेंबरमध्ये ‘पक्षी सप्ताह’; शासकीय मान्यता देणारे महाराष्ट्र पहिले राज्य !

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.