फलटण शहर (सातारा) : ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्या (OBC Political Reservation) मुद्द्यावर भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. हे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (MP Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथे शनिवारी (ता. २६) चक्काजाम आंदोलन (Chakkajam Movement) करण्यात येणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील चौकात (Krantisinha Nana Patil Chowk) सकाळी ११ वाजता या आंदोलनास प्रारंभ होणार आहे. (BJP Agitation Led by MP Ranjit Singh Naik-Nimbalkar at Phaltan on Saturday Satara Marathi News)
ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप आक्रमक झाली आहे.
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (Dr. Shyamaprasad Mukherjee) यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी फलटण शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि विविध आघाडी व मोर्चाचे अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अभिजित नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते. यावेळी जयकुमार शिंदे म्हणाले, ‘‘सध्याचे सरकार नाकर्ते असून गतवेळच्या भाजप सरकारने घेतलेले चांगले निर्णय या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रातील सामान्य जनतेचे फार मोठे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण (Maratha Reservation and OBC Reservation) आणि धनगर आरक्षणाबाबत (Dhangar Reservation) राज्य सरकार दुटप्पीपणाची भूमिका घेत असून, आपल्या नाकर्तेपणाचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे.
केंद्राने केलेल्या चांगल्या कार्याचे श्रेय मात्र राज्य सरकार स्वतःकडे घेत आहे. कोरोना लस (Corona Vaccine) कमी पडल्यास केंद्र सरकारच्या (Central Government) नावाने आरडाओरड केली जाते व त्याच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्यास आम्ही लोकांना मोफत लस पुरवठा करून देऊ, अशा प्रकारच्या वल्गना राज्य सरकारचे प्रतिनिधी करतात.’’ या बैठकीस बाळासाहेब काशीद, सुनील जाधव, नानासहेब इवरे, राजेश शिंदे, राहुल शहा, वसिमभाई मणेर, सागर अभंग, किरण राऊत, संतोष सावंत, शशिकांत रणवरे, सोमनाथ एजगर, सुधीर जगदाळे, नितीन जगताप, तानाजी करळे, रियाजभाई इनामदार, मुक्ती शहा, उषा राऊत, विजया कदम, ज्योती इंगवले, विमल भुजबळ आदींसह भाजपचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
BJP Agitation Led by MP Ranjit Singh Naik-Nimbalkar at Phaltan on Saturday Satara Marathi News
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.