कऱ्हाड (सातारा) : राज्यभरातील सर्व मंदिरे (Temple) खुली करण्यासाठी येथील शहर भाजपतर्फे (BJP) शंखनाद आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली येथील विठ्ठल मंदिरात शंखनाद आंदोलन झाले. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी मारूती बुवा मठाच्या (Maruti Buwa Math) बाहेर आंदोलन केले.
राज्यभरातील सर्व मंदिरे खुली करण्यासाठी येथील शहर भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, श्री. पेंढारकर, सुदर्शन पाटस्कर, उमेश शिंदे, रूपेश मुळे, प्रमोद शिंदे, विवेक भोसले, सागर लादे, रूपेंद्र कदम, विश्वनाथ फुटाणे, उल्हास बेंद्रे, मोहन पुरोहित, विशाल कुलकर्णी, निखील शाह, नितीन शाह, शैलेश गोंदकर, सागर लाखे, सुहास चक्के यांच्यासह मारूती बुवा मटातील सर्व वारकरी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, मंदिरासमोर टाळ-मृदंगाचा गजर करण्यात आला.
यावेळी भूमिका मांडताना शहराध्यक्ष बागडी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या पाच महिन्यात धार्मिक स्थळे बंद ठेवली. त्यामुळे सर्व व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे त्यावर जगणाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अन्य सर्व व्यवहार सुरळीत असताना केवळ मंदिरेच बंद का आहेत, याचा जाब सरकारला विचारायला हवा. सर्व मंदिरे खुली करावीत, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर असे आंदोलन करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून कऱ्हाडमध्येही आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाची दखल घेवून सरकारने मंदिर खुली करावीत, अशी आमची मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.