कर्ज फेडणाऱ्यांना सरकार 50 हजार देणार होतं, त्याचं काय झालं?

शेती पंपासाठी प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे दर द्या : अतुल भोसले
Atul Bhosale
Atul Bhosaleesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : शेती पंपासाठी (Agricultural Pump) प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे पूर्वी दर होता. तो आता प्रतियुनिट चार रुपये ३५ पैसे झाला आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्याव्दारे शेतकऱ्यांची लूट होत आहे, ती लूट थांबवावी, लादलेली दरवाढ रद्द करावी, पूरग्रस्तांना त्वरित अर्थसहायक करावे, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले (BJP General Secretary Atul Bhosale) यांनी केली. शेती पंपाच्या वीज दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपतर्फे तहसीदार कार्यालय, वीज कंपनीच्या कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Summary

शेतीपंपाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपंपासाठी आकारला जाणार दर पूर्वीप्रमाणेच प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे दरानेच बिल आकारावे.

येथील कोल्हापूर नाक्यावरून मोर्चास प्रारंभ झाला. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, दयानंद पाटील, निवासराव थोरात, सयाजी यादव, धोंडीराम जाधव, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, मुकुंद चरेगावकर, प्रमोद पाटील, मोहनराव जाधव, धनाजी जाधव, उमेश शिंदे, आबासाहेब गावडे, चंद्रहास जाधव, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, सचिन पाचुपते, गजेंद्र पाटील, बाळासाहेब घाडगे उपस्थित होते. येथील तहसीलदार कार्यालयापासून मोर्चास सुरवात झाली. मुख्य मार्गाने वीज कंपनीच्या कार्यालय व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यावेळी तेथे निवेदन देण्यात आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी निवेदन देण्यात आले. त्यानंतर श्री. भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Atul Bhosale
मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा 'टाईमपास' बंद करा

श्री. भोसले म्हणाले, शेतीपंपाच्या बिलासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे शेतीपंपासाठी आकारला जाणार दर पूर्वीप्रमाणेच प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे दरानेच बिल आकारावे. महापुरामुळे सहकारी जलसिंचन योजनांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांनाही मोठी मदत करुन पूरग्रस्तांना तातडीने अर्थसहाय्य मिळावे, सरकारने मार्चपासून सबसिडी बंद केल्याने चार रूपये ३५ पैसै प्रमाणे प्रतियुनिट बिल येत आहे. शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची भूमिका घेत आहे, तेव्हा असे अनुचित पाऊल उचलू नये. कोरोना, पुराचे संकट येवून गेले असल्याने वीज कनेक्शन तोडल्यास शेतकरी संकटात सापडू शकतो. तेव्हा सबसिडी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने करावे. पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही मदत देण्यात यावी. महात्मा कृषी फुले योजनेतून नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रूपये राज्य सरकार देणार होते, ते लवकरात-लवकर द्यावे, असेही भोसले यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.