''राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना महिलांच्या हिताच्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.''
रहिमतपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिला संरक्षणासाठी नवे कायदे आणले. विविध योजनांद्वारे महिलांचे बळकटीकरण केले. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला हिताच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. आई व ताईची काळजी घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व देशाला लाभल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश महिला मोर्चा आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले.