'बाळासाहेब, तुम्ही कोणत्या राष्ट्रवादीत? दोन्ही डगरींवर हात ठेऊ नका'; भाजप नेत्याचा NCP आमदाराला टोला

जिल्ह्यात भाजप एक नंबरचा पक्ष करणार असून, उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचाच आमदार असणार आहे.
NCP MLA Balasaheb Patil
NCP MLA Balasaheb Patilesakal
Updated on
Summary

भाजप सशक्त आहेच. मात्र, तो अधिक सशक्त व मजबूत कसा होईल, यासाठी प्रयत्न असणार आहेत.

कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील कामांसाठी आम्ही शिफारशी केल्या. सरकार आमचे आहे. त्यामुळे तो निधी आम्हीच खेचून आणला आहे. विरोधात असणाऱ्यांना निधी मिळत नाही, मग आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी तो निधी कसा आणला, ते त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान भाजप जिल्हाध्यक्ष कदम केले.

आमदार पाटील नेमके कोणत्या राष्ट्रवादीसोबत (NCP) आहेत, तेही त्यांनी स्पष्ट करावे. दोन्ही डगरींवर हात ठेऊ नये, असा टोलाही भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषदेत लगावला. जिल्ह्यातील भाजप एक नंबरचा पक्ष करणार असून, उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचाच आमदार असणार आहे, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

NCP MLA Balasaheb Patil
Radhanagari Dam : तीन तासांत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले; पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता

या वेळी भाजपचे भरत पाटील, मनोज घोरपडे, विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, महिला आघाडीच्या स्वाती पिसाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळणार असून, ज्या कोणाला पक्ष विधानसभेची उमेदवारी देईल, त्यांच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

कदम (Dhairyasheel Kadam) म्हणाले, ‘‘राज्यात व केंद्रात भाजपने जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय जनतेपर्यंत पोचवण्याचे काम असणार आहे. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेऊन भाजप पक्ष जास्तीत जास्त वाढावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या जिल्ह्यातील ज्येष्ठांसह तरुणांचा मेळ घालत व त्यांना बरोबर घेत आपण पक्ष वाढवणार आहे. येणारे वर्ष निवडणुकांचे असणार आहे.

NCP MLA Balasaheb Patil
Loksabha Election : लोकसभेची निवडणूक JDS स्वतंत्रपणे लढणार; भाजपसोबत युती केलेल्या माजी पंतप्रधानांची मोठी घोषणा

त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचून सहकाऱ्यांसमवेत भाजप जिल्ह्यात एक नंबर करण्याचे प्रयत्न करणार आहोत. भाजप सशक्त आहेच. मात्र, तो अधिक सशक्त व मजबूत कसा होईल, यासाठी प्रयत्न असणार आहेत. पक्ष वाढवताना बूथ सक्षमीकरण करण्याचे प्रयत्न असणार आहेत. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी संपर्क कार्यालय ठिकठिकाणी उभारणार आहे.

प्रत्येक सोमवारी जनतेचे प्रश्‍न मिटविण्यासाठी जनता दरबार घेणार आहे. त्याचेही नियोजन झाले आहे. ज्यांना आम्ही दिसत नाही, यात आमचा काय दोष, अशी टीका आमदार पाटील यांच्यावर करून कदम म्हणाले, ‘‘आम्ही सगळ्यांना दिसतो. त्यांना दिसत नाही, हा त्यांचा प्रश्‍न आहे. आमदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना कऱ्हाड उत्तरेत त्यांच्या माध्यमातून दीडशे कोटींची कामे मतदारसंघात आणली होती.

NCP MLA Balasaheb Patil
डॉ. आंबेडकर कमान वाद : 'शिवरायांच्या नावाला आमचा विरोध नाही, बेडगच्या सरपंचांकडून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न'

ते माझ्या मतदारसंघातील जनतेला माहीत आहे. उलट तेथील लोकच मला म्हणतात, तुम्ही आणलेल्या निधीचे विरोधक श्रेय घेत आहेत. त्यामुळे जनता ठरवेल कोणी किती निधी आणला ते. सरकार आमचे आहे. विरोधकांना निधी मिळत नाही, मग जर निधी आमदार पाटील यांनी आणला असेल तर त्यांनी जाहीर करावे, की ते नेमके कोणत्या राष्ट्रवादीमध्ये आहेत, असा टोलाही कदम यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.