#MondayMotivation अपंगत्वावर केली मात, 'त्या' कर्तबगाराला उदयनराजेंची साथ!

#MondayMotivation अपंगत्वावर केली मात, 'त्या' कर्तबगाराला उदयनराजेंची साथ!
Updated on

सातारा : अपंगत्व म्हणजे काही शिक्षा नव्हे.. त्या व्यक्तीमधील विशेषत्वाची जाणीव करून देण्यासाठी दिलेले एक लक्षण असते! म्हणूनच कुणी हात नसूनही आपल्या पायाने चित्र काढतो, तर कुणी आपल्या पायानेच शिल्पाकृती तयार करताना दिसतो. अर्थात यातून त्यांनी आपल्या अपंगत्वावर मातच केलेली दिसते. मात्र, यासाठी गरज असते ती समाजाने सक्षम होण्याची! जे जगणं वाट्याला आलंय त्यांचा स्वीकार करून त्यातच आनंद मानून सोबत जो आधार मिळतोय त्याला सोबती मानून मोठ्या जिद्दीने अंपगत्वावर मात करणारी माणसं ही असतातच.. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे सातारचा शैलेंद्र बोर्डे!
क्रांतीवीरांचे स्मरण हेच परम कर्तव्य 

एकीकडे संपूर्ण देश कोरोना महामाराशी लढा देत आहे, तर दुसरीकडे लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता लागलेली आहे. कोरोनाच्या संकटामुळे भारतामध्ये बेरोजगारी म्हणजेच नोकरी जाण्याचे प्रमाण ही वाढले आहे. कोरोनाने अनेकांची कुटुंबं उध्वस्त केली आहेत, तर काहींचे जगणं मुश्‍किल केलं आहे. अशा संकटात छोटा-मोठा उद्योग उभारून काही कुटुंबं आपला उदरनिर्वाह चालवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तेही आपल्याला आलेल्या अपंगत्वावर मात करुन. सर्व समस्यांना छेद देत शैलेंद्र बोर्डेनी साताऱ्यात छोटा गणेश मूर्ती स्टॉल उभारला आहे. मनामध्ये एखादं काम करण्याची तीव्र इच्छाशक्ती असेल तर कोणतंही काम अश्‍यक्‍य नाही, हेच त्यांनी यानिमित्ताने दाखवून दिलं आहे.शैलेंद्र यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच! त्यात लहानपणापासून अपंगत्वाने जखडलेलं, त्यामुळे कोणताही व्यवसाय करणं म्हणजे फार जिकरीचचं.

आरोग्य विभागाच्या रिक्त जागांचा हा महत्वपूर्ण निर्णय
 

शैलेंद्र बबन बोर्डे हे मूळचे शिवथरचे (ता. जि. सातारा). मात्र, ते कामानिमित्त सातारला स्थायिक झाले आणि ते अस्सल 'सातारकर' झाले. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. मात्र, इथं ही अपंगत्व आड आले.त्यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच! त्यात लहानपणापासून अपंगत्वाने जखडलेलं, त्यामुळे कोणताही व्यवसाय करणं म्हणजे फार जिकरीचचं.. अपंगत्वामुळे त्यांना कुठे नोकरीही मिळाली नाही. अनेक वेळा त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, ते जिद्द कधीच हरले नाहीत. उलट जोमाने ते साताऱ्यामध्ये लिंबू-सरबत, पान टपरी, कॅलेंडर विक्रीचा छोटे छोटे व्यवसाय करु लागले. त्यांची जिद्द व चिकाटी पाहून त्यांचा साताऱ्यात मित्र परिवार निर्माण झाला. सर्व काही सुरळीत सुरु असताना मार्च महिन्यांत कोरोनाने साताऱ्यात एंट्री केली. त्यातून लॉकडाउन, कॅन्टेंन्मेंट झोन असे निर्बंध शहरात वाढले. त्यामुळे लोकांना काळात घरातून बाहेर पडणे मुश्‍किल झाले.

अंतिम वर्षाच्याअंतिम सत्राच्या परीक्षांबाबत 'या' दिवशी होणार सुनावणी...

ऐन मार्च महिन्यांत लॉकडाऊन झाल्याने शैलेंद्रचा लिंबू सरबतचा व्यवसाय ठप्प झाला. काही दिवसानंतर शैलेंद्र यांनी जीवाची पर्वा न करता प्रसंगी घरोघरी जाऊन वर्तमानपत्र टाकली. यात त्यांना वेळोवेळी कुटुंबियांची देखील साथ लाभली. आता गणेशोत्सव अवघ्या 12 दिवसांवर येऊन ठेपल्याने शैलेंद्रच्या मनात बाप्पांचा स्टॉल उभे करण्याचे आले. येथील नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या शेजारी त्याने स्टॉल उभा केला. त्यासाठी 10 हजार रुपयांचे कर्ज काढले. लॉकडाउनमुळे शहरातील अनेक कंपन्या बंद अवस्थेत आहेत, त्यात पोट भरण्यासाठी अनेकांची वणवण सुरू आहे. हे सगळं चाललंय ते केवळ पोटासाठीच! मात्र, यात ही कोरोनाच आड येतोय.. त्यामुळे सामान्यांनी जगायचं कसं? हा प्रश्न उपस्थित राहताना दिसतोय. केवळ अपंगत्व आहे म्हणून नोकऱ्या मिळत नाहीत, जरी व्यवसाय टाकला तर अपंग आहे म्हणून त्यास लोकांचा प्रतिसादही मिळत नाही, त्यामुळे साहजिकच आहे.. अशा दिव्यांग लोकांनी जगायचं कसं? हा प्रश्‍न उपस्थित होतो. आज शैलेंद्र सारख्या दिव्यांग व्यक्तीने नोकरी मिळत नाही म्हणून निराश झालेल्या युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले आहे.

ती निराश झाली नाही... बनवल्या चक्क 400 गणेशमूर्ती 

दरम्यान, सातारा शहरात कॅलेंडर विकून आपली उपजीविका करत असलेला हा अपंग युवक कॅलेंडर विक्री बरोबर लिंबू-सरबतचा व्यवसायही करत असतो. आपण अपंग असलो तरी आपण काम करुन कुटुंब चालविले पाहिजे, याची जाणीव त्यांना आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी अपंगत्वावर मात करत आपणही उद्योगधंदा केला पाहिजे, ही जिद्द उराशी बाळगून छोट्या व्यवसायातून मोठ्या व्यवसायाकडे जाण्याचा मोठा निर्णय घेऊन स्वकर्तृत्वाने श्री गणेशांच्या मुर्तीचा स्टॉल टाकायचा निर्धार केला. असे कौतुक खासदार उदयनराजे भोसले यांनी गणपती स्टॉलला भेट दिल्यानंतर त्यांच्या ट्‌विटरवरुन केले. त्याशिवाय या युवकाच्या आत्मनिर्भरतेस उदयनराजेंनी लागेल ती मदत करण्याचेही आश्‍वासित केले. दिव्यांसाठी एडीप महत्वपूर्ण योजना आहे.

सातारा : या गावातील गणेशमूर्ती मुंबईकरांच्या मखरात होणार विराजमान

शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना  दुष्कर किंवा अशक्‍यप्राय झाले आहे, अशा व्यक्तींना अपंग व्यक्ती म्हणतात. मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते. भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग अपंग व्यक्तींच्या सामाजिक व आर्थिक पुनर्वसनासाठी विविध योजना राबविते. त्यात अपंग व्यक्तींना सहायक साधने पुरविण्यासाठी एडीप ही एक महत्वपूर्ण योजना आहे.

ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेलं एक रम्य ठिकाण शिखर शिंगणापूर! 

खासदार उदयन महाराजांनी मला वेळोवेळी मदत केली आहे. तसेच खासदार फंडातून मला दरमहा एक हजाराची मदत होत असते. त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातूनही मला अपंग साहाय्यता निधी मिळतो. मात्र, या कोरोना काळात मला खूप संघर्ष करावा लागला. आर्थिक संकटांना सामोरे जावं लागलं, परंतु मी जिद्द हरलेलो नाही. अपंग असलो तरी येणारा प्रसंगाशी दोन हात करायचा निश्‍चय केला. त्यातून पेपर टाकायचे काम केले. आता गणपती बाप्पांचा स्टॉल उभा केलाय. 

- दिव्यांग शैलेंद्र बबन बोर्डे

शहरात फिरुन कॅलेंडर विकून आपली उपजीविका भागवत असलेला अपंग युवक कॅलेंडर विक्री बरोबर लिंबू-सरबत चा व्यवसायही करत असतो. आपण अपंग असलो तरी आपण काम करुन पोट भरलं पाहिजे याची जाणीव त्याला आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने अपंगत्वावर मात करत आपणही उद्योगधंदा केला पाहिजे ही pic.twitter.com/Y4H8VF8Ee1

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.