राज्यात तीन पक्षांचं सरकार, आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा पेच कसा सोडवणार? BJP आमदारानं दिलं स्पष्ट उत्तर

भारतीय जनता पक्ष (BJP) संघटित असून, जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष आहे.
Upcoming Assembly Election
Upcoming Assembly Electionesakal
Updated on
Summary

सध्या तिन्ही पक्षांचे सरकार असलं, तरी जिल्ह्यात भाजपचाच विस्तार अधिक होणार असल्याचे स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

सातारा : भारतीय जनता पक्ष (BJP) संघटित असून, जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्ष देईल, त्या उमेदवाराला निवडून आणणार असल्याचा विश्‍वास आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दरम्यान, सध्या तिन्ही पक्षांचे सरकार असलं, तरी जिल्ह्यात भाजपचाच विस्तार अधिक होणार असल्याचे स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे शिरवळ, भुईंज, वाढे फाटा आदी ठिकाणी स्वागत करण्यात आले.

Upcoming Assembly Election
Kolhapur Rain : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर! 75 बंधारे पाण्याखाली; जाणून घ्या कोणते मार्ग सुरु, कोणते बंद

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मावळते जिल्हाध्यक्ष श्री. गोरे यांनी धैर्यशील कदम यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते. खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, विक्रम पावसकर, भरत पाटील, सुवर्णा पाटील, दत्ताजी थोरात, भीमराव पाटील, मनोज घोरपडे, सुरभी भोसले व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Upcoming Assembly Election
वाद चिघळणार! बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची स्वागत कमान पाडणाऱ्या दोषींवर होणार कारवाई; SC आयोगाचा इशारा

गोरे म्हणाले, ‘‘मला जिल्हाध्यक्ष असताना मिळालेले पाठबळ धैर्यशील कदम यांनाही मिळेल. पक्षाच्या योजना राबविण्यात कार्यकर्त्यांचे श्रम अधिक असून, कार्यकर्त्यांवर टाकलेली जबाबदारी ते पूर्ण करत आहेत. भाजप जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष ठेवण्यास ते निश्‍चितपणे परिश्रम करतील, तसेच जिल्हाध्यक्ष पदातून मुक्त झालो तरी कार्यकर्त्यांसाठी ठामपणे उभा आहे.’’

निंबाळकर म्हणाले, ‘‘गेल्या काही वर्षांत पक्षाला उभारी देण्यात विक्रम पावसकर, भरत पाटील व जयकुमार गोरे यांचा मोठा वाटा आहे. धैर्यशील कदम यांनाही पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली असून, तेही ताकदीने पक्षाचा विस्तार करतील, असा विश्‍वास आहे.’’

Upcoming Assembly Election
Chiplun Flood : आता महापुराची माहिती मिळणार एका 'क्लिक'वर; Mobile वर येणार सतर्क राहण्याचा संदेश

कदम म्हणाले, ‘‘गेल्या ३० वर्षांपासून राजकारण, समाजकारण करत आहे. जिल्ह्यात पक्षाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून, ही उंची टिकविण्याचे आवाहन माझ्यासमोर आहे. गेल्या वर्षभरात भाजप- शिंदे सरकारमुळे विकासाचा वेग वाढला असून, जिल्ह्यात विकासकामांसाठी मोठा निधी दिला आहे.’’

ग्रामपंचायत सदस्यापासून माझी राजकारणाला सुरुवात झाली आहे. सर्वात मोठ्या पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष होण्याची संधी मला दिली असून, सर्वांना बरोबर घेऊन पक्ष वाढविणार आहे, तसेच पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ व समर्थपणे पेलणार आहे.

- धैर्यशील कदम, जिल्हाध्यक्ष, भाजप

Upcoming Assembly Election
Sindhudurg Flood : सिंधुदुर्गात वरुणराजाची जोरदार मुसंडी, कणकवलीला महापुराचा धोका; आंबोली, करुळ घाटात कोसळल्या दरडी

कऱ्हाड उत्तर, वाईला कोण?

तिन्ही पक्षाचे सरकार असल्याने आगामी निवडणुकांमध्ये जागा वाटपाचा पेच कसा सोडविणार? असा प्रश्‍न जयकुमार गोरे यांना विचारला असता कऱ्हाड उत्तरमध्ये मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, वाई मतदारसंघात मदन भोसले, माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष असल्याचे सांगत जयकुमार गोरे यांनी विधानसभा व लोकसभेला पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची एकप्रकारे चाहूल दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.