Jaykumar Gore : 'रामराजे डरपोक पुढारी, दुलदुली औरंगजेबनीती त्यांनी बंद करावी'; जयकुमार गोरेंची सडकून टीका

Jaykumar Gore vs Ramraje Nimbalkar : लोकसभेला महायुती तोडली तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती. त्यांना महायुतीत मदत कुणी मागितली आहे.
Jaykumar Gore vs Ramraje Nimbalkar
Jaykumar Gore vs Ramraje Nimbalkaresakal
Updated on
Summary

हरियानामधील निकालानंतर रामराजेंचे चीत भी मेरी अन्‌ पट भी मेरी असे राजकारण सुरू झाले आहे.

बिजवडी : सत्तेची कवचकुंडले नसतील, तर रामराजे दबावाचे आणि दहशतीचे राजकारण करू शकत नाहीत, हे समजल्यानेच ते विचलित झाले आहेत. ते जिल्ह्यातील सर्वाधिक डरपोक पुढारी आहेत. त्यांच्याकडून लोकसभेलाही नव्हती आणि आत्ताही महायुती धर्म पाळण्याची अपेक्षा ठेवली नाही. कार्यकर्ते दुसरीकडे आणि हे तिसरीकडे राहणार असल्याचा पोरखेळ त्यांनी सुरू केलाय. आमच्या नावाखाली त्यांनी त्यांची पापे लपवू नयेत. कुणाच्यातरी पदराआडून असल्या चाली खेळणे बंद करावे, असा टोला आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी आमदार रामराजेंना (Ramraje) लगावला.

Jaykumar Gore vs Ramraje Nimbalkar
Rohit Pawar : 'महाराष्ट्राच्या राजकारणात 50 आकड्याला फार महत्त्‍व'; असं का म्हणाले आमदार रोहित पवार?

फलटणमधील कार्यक्रमात आमदार रामराजेंनी जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या सांगण्यावरून भाजप (BJP) चालणार असेल, तर महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार नाही, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना दहिवडीत पत्रकारांशी बोलताना श्री. गोरे म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांना आशीर्वाद देऊन रामराजे महायुती सोडून जा, असे सांगत आहेत. मग ते स्वतः का थांबले आहेत, हे कुणालाच समजत नाही, अशी त्यांची बाळबोध कल्पना आहे. महायुतीचा प्रयोग करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिलाय. #ElectionWithSakal

लोकसभेला महायुती तोडली तेव्हा त्यांची निष्ठा कुठे गेली होती. त्यांना महायुतीत मदत कुणी मागितली आहे. यापूर्वी त्यांनी कधी महायुतीला मदत केली आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांची आणि आमची लढाई आजची नाही. २००७ पासून आम्ही सत्तेत नसताना, आमच्याकडे काही नसताना न रडता आम्हीही लढत आलो आहोत. नेहमी काड्या आणि जाळ घालणारे रामराजे सत्तेत असताना, सभापती असताना त्यांनी आमच्यावर अनेक केसेस घातल्या; पण आम्ही त्यांना कधी यशस्वी होऊ दिले नाही.’’

Jaykumar Gore vs Ramraje Nimbalkar
Kolhapur Election : काँग्रेसच्या वाट्याला दहापैकी 'इतक्या' जागा; ठाकरे, शरद पवार गटाला प्रत्येकी दोन जागा मिळणार!

औरंगजेबनीती बंद करा

हरियानामधील निकालानंतर रामराजेंचे चीत भी मेरी अन्‌ पट भी मेरी असे राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात कुणाचीही सत्ता आली, तरी आपण सत्तेबरोबर राहावे म्हणून ते चाली खेळत आहेत. आपण एकीकडे आणि कार्यकर्ते दुसरीकडे अशी दुलदुली औरंगजेबनीती त्यांनी बंद करावी, असा टोलाही आमदार गोरे यांनी यावेळी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.