आमदार गोरेंच्या नेतृत्वात भाजप, तर प्रभाकर देशमुखांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असा मुख्य सामना होत आहे.
दहिवडी (सातारा) : येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Dahiwadi Nagar Panchayat Election) तीन प्रभागांत दुरंगी, तर दहा प्रभागांत बहुरंगी लढती होत आहेत. काल उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ प्रभागांतील २१ उमेदवारी अर्ज माघारी घेतले गेले. त्यामुळे १३ जागांसाठी ३९ जण मैदानात उतरले आहेत. आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्या नेतृत्वाखालील भाजप, प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी असा मुख्य सामना होत असून, नगरपंचायत निवडणूक ताकदीने लढण्याचा दावा केलेल्या शेखर गोरे (Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व रणजितसिंह देशमुख (Ranjitsingh Deshmukh) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला (Congress) अनुक्रमे चार व सात जागांवर उमेदवार देण्यात यश आले आहे.
प्रभाग क्रमांक २ मध्ये वर्षाराणी विलास सावंत (राष्ट्रवादी) उषा दादासो जाधव (भाजप). प्रभाग क्रमांक ३ मध्ये पूनम विजय जाधव (भाजप), जयश्री साईनाथ जाधव (राष्ट्रवादी), विजया रवींद्र जाधव (शिवसेना). प्रभाग क्रमांक ४ मध्ये महेश पतंगराव जाधव (राष्ट्रवादी), पंढरीनाथ रामचंद्र जाधव (भाजप), उत्तम सीताराम जाधव (काँग्रेस), प्रभाग क्रमांक ५ मध्ये सिद्धार्थ भास्करराव गुंडगे (भाजप), अजित ज्ञानदेव पवार (राष्ट्रवादी), प्रवीण सदाशिव अवघडे (काँग्रेस), किरण मुकिंदा दाहिंजे (अपक्ष), शैलेंद्र पंढरीनाथ खरात (शिवसेना). प्रभाग क्रमांक ७ मध्ये उज्ज्वला अमर पवार (भाजप), लक्ष्मी दादासो खांडे (राष्ट्रवादी), नाझिया मुन्शी शेख (शिवसेना), प्रभाग क्रमांक ८ मध्ये मोनिका सूरज गुंडगे (राष्ट्रवादी), सुवर्णा बस्वलिंग साखरे (भाजप). प्रभाग क्रमांक ९ मध्ये संध्याराणी नानासाहेब जाधव (राष्ट्रवादी), नीलिमा अतुल जाधव (भाजप), वंदना सचिन गायकवाड (काँग्रेस).
प्रभाग क्रमांक १० मध्ये आशालता दिलीपराव जाधव (भाजप), नीलिमा सुनील पोळ (राष्ट्रवादी), रेश्मा नीलेश पोळ (काँग्रेस). प्रभाग क्रमांक ११ मध्ये मीना दत्तात्रय अवघडे (राष्ट्रवादी), राणी तानाजी अवघडे (भाजप), सतिका मनोज देवकुळे (काँग्रेस). प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजेंद्र रामचंद्र साळुंखे (अपक्ष), विजय वसंत जाधव (भाजप), अर्शद लुकमन शेख (काँग्रेस), किरण मुकिंदा दाहिंजे (अपक्ष). प्रभाग क्रमांक १३ मध्ये शिवाजी साहेबराव शिंदे (भाजप), विशाल उद्धव पोळ (राष्ट्रवादी), तानाजी सुरेश जाधव (शिवसेना). प्रभाग क्रमांक १५ मध्ये रूपेश सुरेश मोरे (भाजप), धीरज महादेव शिंदे (काँग्रेस), अर्चना विजय खरात (राष्ट्रवादी पुरस्कृत), प्रभाग क्रमांक १६ मध्ये सुरेंद्र गणपती मोरे (राष्ट्रवादी), सयाजी दादासो मोरे (भाजप) अशा लढती होणार आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये राष्ट्रवादीने राजेंद्र साळुंखे या अपक्षाला पाठिंबा दिला आहे, तर भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या विद्यमान नगरसेविका अर्चना खरात यांना प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादीने पुरस्कृत केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.