'संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये मी कमी पडलो नाही.'
फरांदवाडी : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी संसदेमध्ये व विकासकामांच्या मंजुरी व निधी याबाबत सर्वोत्कृष्ट काम केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना गत निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य देऊन जनता त्यांना विजयी करून त्यांच्या कार्याची पोचपावती देईल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी व्यक्त केला.
दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिल्ली येथे भाजपच्या (BJP) कार्यालयात पक्षाध्यक्ष नड्डा यांची भेट घेऊन त्यांना माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Loksabha Constituency) केलेल्या विकासकामांची व प्रकल्पांची माहिती दिली. या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान नड्डा यांनी समाधान व्यक्त केले.
माढा लोकसभा मतदारसंघ हा दुष्काळी मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या मतदारसंघांमध्ये कोणतीही पाण्याची योजना शिल्लक ठेवली नाही. पाणी, रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर, एमआयडीसी ही महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावण्यामध्ये आपण यशस्वी झालो, तसेच संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्याही प्रश्नांची सोडवणूक करण्यामध्ये कमी पडलो नाही.
यापुढेही पक्ष संघटना व जनतेसाठी सातत्याने संपर्क ठेऊन मतदारसंघाचा विकास घडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार निंबाळकर यांनी दिली. तुम्ही केलेल्या विकासकामांवर सर्व लोकप्रतिनिधी, पक्ष, महायुतीतील घटक पक्ष, कार्यकर्ते, जनता समाधानी आहे. पुढील काळातही असेच चांगले काम करा, असा सल्ला देऊन जे. पी. नड्डा यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.