सातारा: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. माझी निवडणुकीची हौस भागली आहे. माझ वैयक्तिक मत आहे की शासकीय सेवेत असंत तसं राजकारणातही निवृत्तीच वय असावं, असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीऐवजी उमेदवाराचं प्रचारक म्हणून काम करायला आवडेल, असं देखील त्यांनी स्पष्ट केले. उदयनराजे साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेवेळी माजी सभापती सुनील काटकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित होते.
यावेळी उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत देखील वक्तव्य केले. शरद पवार यांनी मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री अनेक पदे उपभोगली आहेत. त्यांनी आता मार्गदर्शक म्हणून भूमिका बजवावी, असा सल्ला उदयनराजे यांनी दिला.
आरोपांना आम्ही भीक घालत नाही -
सातारा विकास आघाडीने लूट केली, अशी टीका करत संभ्रम निर्माण करण्यासाठी ते बिनबुडाचे आरोप करतात. त्यांच्या आरोपांना आम्ही भीक घालत नाही. पालिकेतील आत्ताच्या आणि या आधीच्या काळात सत्तेत जे होते, त्यांच्या कारभाराची ईडीने चौकशी करावी, अशी माझी मागणी असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी आज येथील पत्रकार परिषदेत नोंदवत शिवेंद्रसिंहराजेंच्या टीकेला उत्तर दिले. (Latest Marathi News)
उदयनराजे म्हणाले, ‘‘आमच्या आघाडीवर आरोप करणारे ते विद्वान असावेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आमच्या आघाडीवर बिनबुडाचे आरोप केले आहेत. मुळात लोकांच्या मागणीनुसारच सातारा विकास आघाडीची स्थापना झाली. त्यावेळी जे पालिकेचा कर भरत होते, त्यांना मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या. तुमच्याकडे सर्व ठिकाणी एकहाती सत्ता होती. त्यावेळी लोकांचा विचार का केला नाही? त्याला कारण त्यांचा अहंकार, इच्छाशक्ती कमी पडली.
प्रत्येक गोष्टीत सोंग करता येते; पण पैशाचे करता येत नाही. हद्दवाढीसाठी तीन वर्षांत १२४ कोटी रुपयांचा निधी आम्ही आणला.’’ चौकशीला सामोरे जाण्यास, पालिकेचे ऑडिट करण्यास आम्ही तयार आहोत. पालिकेत येऊन जमा खर्चाची पुस्तके बघा. साविआने लोकांच्या विश्वासाला पात्र राहणे, हेच कर्तव्य समजल्याचे वक्तव्यही त्यांनी या वेळी केले.
आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याबाबत विचार व्हावा-
जरांगे-पाटील यांच्या सभेला अंतरवालीला जाणार का? या प्रश्नावर त्यांनी मराठा समाजातील आर्थिक दुर्बल लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडून जातीनिहाय जनगणना झाली, तर सर्व काही समजून येईल. त्यानंतर आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याबाबत विचार व्हावा. जरांगे- पाटील यांची सभा होऊ देत, मग ठरवू काय करायचे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.