सातारा पालिका निवडणूकीसाठी भाजपचा स्‍वबळावर शिक्का

पदाधिकाऱ्यांची बैठक; उमेदवार निवडून आणण्‍याचे आवाहन
Satara
Satarasakal
Updated on

सातारा : सातारा (Satara) नगरपालिकेची येणारी निवडणूक भारतीय जनता पक्षाने स्‍वबळावर लढविण्‍याचा निर्धार व्‍यक्‍त करत कामाला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने आज येथील विश्रामगृहात झालेल्‍या बैठकीत शहरातील १३१ बुथ कमिट्यांच्‍या कामकाजाचा आढावा घेण्‍यात आला. आढावा घेतल्‍यानंतर वरिष्‍ठांच्‍या सूचनेनुसार निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्‍यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पक्षाने दिलेल्‍या उमेदवारास विजयी करण्‍याचे आवाहन जिल्‍हाध्‍यक्ष विक्रम पावसकर यांनी उपस्‍थितांना केले.

या बैठकीसाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमित कुलकर्णी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्‍यक्षा सुवर्णा पाटील, मार्गदर्शक दत्ताजी थोरात, शहराध्‍यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, नगरसेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, मिलिंद काकडे, नगरसेविका सिद्धी पवार, प्राची शहाणे, राजेंद्र इंगळे, सातारा शहरचे सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, चंदन घोडके, प्रशांत जोशी, वैशाली टंकसाळे, रवी आपटे, नजमा बागवान तसेच विविध आघाडी, मोर्चाचे अध्‍यक्ष, पदाधिकारी तसेच बुथ कमिटी प्रमुख उपस्‍थित होते.

Satara
विविध राज्यातील मंदिरे, यात्रीनिवासांसाठी 67 कोटी : मंत्री शशिकला जोल्ले

सुरुवातीस विकास गोसावी यांनी गत निवडणुकीत भाजपने केलेल्‍या कामगिरीचा आढावा मांडत यंदा परिस्‍थिती अधिक सकारात्‍मक असल्‍याचे सांगत सर्वच जागांवर पक्षाला उमेदवार मिळतील, असा विश्‍‍वास व्‍यक्‍त केला. यानंतर अमित कुलकर्णी, सुवर्णा पाटील यांनी शहरातील कार्यकर्ते चांगले काम करत असून, भाजपचे चिन्ह घराघरांत पोचवण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना केले.

Satara
''नवाब मलिक NCB च्या मोहिमेत अडथळा आणण्याचे काम करतात''

यानंतर विक्रम पावसकर म्‍हणाले,‘‘ साताऱ्यात पक्षाचे सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जात असून, येथील परिस्‍थिती चांगली असून, त्‍याला प्रदेशाध्‍यक्षांनीही दुजोरा दिला आहे. सर्वांनी मिळून काम केले तर काहीच अवघड नाही. उमेदवारी मिळाली तर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत, उमेदवारी नाही मिळाली तर पक्षाच्‍या उमेदवाराच्‍या पाठीशी ठामपणे उभे राहत त्‍याच्‍या विजयात योगदान द्यावे.’’ भाजप सातारा पालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असून, सर्वांनी कामास सुरुवात करण्‍याचे आवाहनही त्‍यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.